अफगाणिस्तानच्या मोहम्मद शेहजादने टीम इंडियाविरुद्ध केला हा अनोखा विक्रम

दुबई। 25 सप्टेंबरला भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात एशिया कपमधील सुपर फोरचा सामना पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना बरोबरीत सुटला.

या सामन्यात अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शेहजादने शतक करताना 116 चेंडूत 124 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 7 षटकार मारले. तसेच भारताविरुद्ध एक खास विक्रम रचला आहे.

त्याने या सामन्यात मारलेल्या 7 षटकारांसह भारताविरुद्ध एका वनडे सामन्यात सलामीवीर फलंदाजाने सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. याबरोबरच त्याने या यादीत शाहीद आफ्रिदीच्या 6 षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर संयुक्तरित्या 9 षटकारांसह पाकिस्तानचे इजाज अहमद आणि शाहिद आफ्रिदी आहे.

त्याचबरोबर शेहजादचे हे वनडे क्रिकेटमधील 5 वे शतक होते. तो यावर्षी अफगाणिस्तानकडून रेहमत शहानंतर शतक करणारा दुसराच फलंदाज आहे. तसेच तो भारताविरुद्ध यावर्षी वनडेत शतक करणारा फक्त तिसराच क्रिकेटपटू ठरला आहे.

याआधी यावर्षी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि इंग्लडचा जो रुट यांनी भारताविरुद्ध वनडेत शतके केली आहेत.

भारताविरुद्ध एका वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे सलामीवीर फलंदाज-

9 षटकार – इजाज अहमद (पाकिस्तान), सामना- 2 आॅक्टोबर 1997

9 षटकार – शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान), सामना- 15 एप्रिल 2005

8 षटकार – गोर्डन ग्रिनिज (विंडिज), सामना- 18 मार्च 1989

7 षटकार – मोहम्मद शेहजाद (अफगाणिस्तान), सामना- 25 सप्टेंबर 2018

6 षटकार – शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान), सामना- 19 सप्टेंबर 1998

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राचे राज्यस्तरीय कबड्डी पंच शिबीर २८सप्टेंबरपासून तीन दिवस पुण्यात

Video- बाॅलिंग करेगा या बाॅलर चेंज करे, जेव्हा धोनीला राग येतो

टीम इंडियाला नडलेल्या अफगाणिस्तान संघावर कौतूकाचा वर्षाव