जर अफगाणिस्तान एशिया कपमध्ये आज टीम इंडियाविरुद्ध जिंकला तर….

दुबई | आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना दुबई इंटरनॅशल क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. हा सामना दोन्हीही संघासाठी तसा महत्त्वाचा नाही.

भारतीय संघाने सुपर ४चे २ सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने बांगलादेश आणि पाकिस्तान संघाविरुद्ध विजय मिळवले आहेत. त्यामुळे संघाचे २ सामन्यात ४ गुण झाल्यामुळे संघ सुपर ४ गटात अव्वल आहे.

दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तान संघ बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध सुपर ४चे सामने पराभूत झाला आहे. त्यामुळे ते ४ संघांत तळाला आहे. यामुळे त्यांंना या सामन्यात जरी विजय मिळाला तरी ते अंतिम फेरीत प्रवेश करु शकत नाही.

तसेच उद्या होणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात जो संघ विजयी होणारा तो २६ सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

एशिया कप २०१८: टीम इंडियासाठी या कारणामुळे अफगाणिस्तान आहे धोकादायक

रोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित

म्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल

शिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज