या दोन खेळाडूंनी तिसऱ्या कसोटीत यावे सलामीला

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 26 डिसेंबर पासून तिसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. या कसोटी आधी भारतीय संघासमोर सलामीच्या फलंदाजांचा प्रश्न उभा आहे.

कारण दुखापतीमुळे पृथ्वी शॉ भारतात परतला आहे, तर मुरली विजय आणि केएल राहुल सातत्याने धावा करण्यात अपयशी ठरत आहेत.

शॉच्या ऐवजी मयंक अगरवालचा आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे तो मेलबर्न येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करेल अशी आपेक्षा भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्याच्याकडून खूप मोठी अपेक्षा ठेवू नका असेही मांजरेकरांनी सांगितले आहे.

मांजरेकरांनी इंडिया टिव्हीला सांगितले की ‘मी वैयक्तिकरित्या सलामीवीर फलंदाज म्हणून मयंक अगरवाल आणि मुरली विजय यांना संधी देईल.’

‘जरी तूम्ही मयंक अगरवालला खेळवले तरी त्याच्याकडून मोठी अपेक्षा करु नये कारण एखाद्या भारतीय फलंदाजाने थेट आॅस्ट्रेलियन खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठिण आहे. विशेषत: वरच्या फळीतील फलंदाजासाठी. कुकाबुरा चेंडू फलंदाजांसाठी त्रासदायक असतो.’

त्याचबरोबर हनुमा विहारीच्या शैलीनेही प्रभावित झालेल्या मांजरेकरांनी विहारी हा देखील सलीमीसाठी पर्याय ठरु शकतो असे सांगितले आहे.

ते म्हणाले, ‘आॅस्ट्रेलियाच्या या वातावरणात जेव्हा तूम्ही विहारीची फलंदाजी पाहता तेव्हा तूमच्यावर प्रभाव पडतो की त्याची खेळण्याची शैली चांगली आहे. तो विकेटच्या समोर सरळ फटके मारुन धावा करतो. तसेच तो शांत असतो.’

‘तो वरच्या फळीतील फलंदाज असून तो पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. त्यामुळे तो वरच्या फळीत फलंदाजी करणे फायदेशीर आहे. यामुळे जर दबावात असणाऱ्या अगरवालचा धोका पत्करण्यास भारतीय संघ तयार नसेल तर विहारी हा एक पर्याय आहे.

मयंक अगरवालबरोबरच भारतीय संघात तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी हार्दिक पंड्याचाही समावेश करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अरे मुर्खा तुला कुणी आयपीएलमध्ये विकत तरी घेतलंय का?

बुमराहला खेळाताना पाहिलं की त्या महान गोलंदाजाची आठवण येते- डेनिस लीली

तिसऱ्या पंचांनी दिले बाद, क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाने परत बोलवले फलंदाजीला