या खेळाडूंना मिळू शकते ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघात स्थान

येत्या १७ सप्टेंबरपासून भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका सुरु होणार आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेत नक्की काय बदल होणार याचा काहीही अंदाज नाही. डिसेंबर महिन्यात भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर जात असून त्यापूर्वी तब्बल २३ आंतरराष्ट्रीय सामने हा संघ स्वदेशात खेळणार आहे. त्यामुळे खेळाडूंना विश्रांती देणे किंवा नव्या खेळाडूंना संधी देणे हे ओघानेच आले.

या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड होणार असून आर अश्विन सध्या काउंटी क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे त्याबद्दल नक्की काय निर्णय होतो हे लवकरच कळेल. परंतु अश्विन काउंटी क्रिकेटचं ही मालिका होईपर्यंत खेळेल असे काही मीडिया रिपोर्ट आहेत.

पहिल्या तीन सामन्यासाठी निवड होणाऱ्या संघात रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि एमएस धोनी यांची जागा पक्की असल्याचं बोललं जात आहे. रोहित आणि धवनने स्वतःला सिद्ध केलं आहे तर रहाणेला विंडीज दौऱ्यानंतर केवळ एका सामन्यात संधी देण्यात आली आहे. सध्या धोनी आणि विराट हे अफलातून फॉर्ममध्ये आहे त्यामुळे ते विश्रांती घेण्यासाठी नक्कीच उत्सुक नसतील. आपली लय कायम ठेवण्यासाठी ते नक्कीच ही मालिका खेळतील.

कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी करणारा केएल राहुल हा वनडेमध्ये म्हणावा तशी कामगिरी करू शकला नाही. संधी मिळालेल्या मनीष पांडेने त्याचे सोने केले. मधल्या फलित कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची क्षमता असलेल्या या खेळाडूला या मालिकेत नक्की संधी मिळेल. केएल राहुलला संघातून वगळले जाऊ शकते. यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला संघात त्याच्याजागी स्टेषन दिले जाऊ शकते.

अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या आणि केदार जाधव या दोनही अष्टपैलू खेळाडूंना पुन्हा संधी मिळू शकते. ही मालिका हार्दिक पंड्या साठी तेवढी चांगली राहिली नाही.

फिरकी गोलंदाजीचा भार हा श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या गोलंदाजांवर असेल. अक्सर पटेल, युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव यांना संघात कायम ठेवले जाऊ शकते.

वेगवान गोलंदाजांमध्ये शार्दूल ठाकूरच्या ऐवजी मोहम्मद शमी पुन्हा संघात येऊ शकतो. तर भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह हे संघात कायम राहू शकतात.