कुलदीपच्या यशापाठीमागे एमएस धोनी !

कोलकाता । कुलदीप यादवने काल हॅट्रिक विकेट घेताना वनडेत हॅट्रिक विकेट घेणारा केवळ तिसरा भारतीय बनण्याचा मान मिळवला. याचे सर्व श्रेय या खेळाडूने भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीला दिले.

सामना संपल्यानंतर कुलदीप यादवने हा ऐतिहासिक विक्रम करताना यापूर्वी सर्व गोष्टी सुरळीत होत नव्हत्या असे तो म्हणाला.जेव्हा ग्लेन मॅक्सवेलने त्याला ३ षटकार मारले होते तेव्हा वाईट वाटले असेही तो पुढे म्हणाला.

“मी सुरुवातीला गोलंदाजी करताना संघर्ष करत होतो. परंतु ह्या खेळाला क्रिकेट म्हणतात. सर्वकाही होऊ शकते. मला शेवटच्या सामन्यात ३ षटकार एका षटकात मारले. त्या अनुभवातून मी शिकलो. मी तेव्हा धोनी भाईला विचारले मी काय करू? कशी गोलंदाजी करू? तेव्हा माही भाई बोलले की तुझे जैसा लगता हैं वैसा डाल. ही हॅट्रिक माझ्यासाठी खास आहे. आमच्यासाठी सामना फिरवणारी हॅट्रिक ठरली. हा खरंच अभिमानाचा क्षण होता. “ असे कुलदीप म्हणाला.

भारतीय कर्णधार विराटच्या कुलदीप यादवच्या या कामगिरीवर खुश होता. विराट म्हणतो, ” कुलदीप आणि अक्सर हे अतिशय चांगली कामगिरी करत आहेत. त्यातून त्यांचे एकप्रकारचे वेगळेपण दिसते.”