विराटला शत्रू नव्हे, मित्र बनवा; हा अजब सल्ला दिला आहे आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने

डिसेंबर महिन्याच्या 6 तारखेपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होत आहे. यातच अनेक माजी ऑस्ट्रेलिया आणि भारत संघाचे क्रिकेटपटू या मालिकेबद्दल आपले तर्क-वितर्क लावत आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी असेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बद्दल आश्चर्यकारक विधान करत खळबळ निर्माण करून दिली आहे.

“ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी विराटला प्रवृत्त करू नये. नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील. कारण त्याच्यामध्ये चुका शोधणे अवघड आहे. पण खेळाडूंनी त्याच्या कव्हर ड्राईव्ह शॉट्सचे कौतूक करावे “, असे जोन्स म्हणाले.

“भारतीय संघ ही मालिका 2-0 किंवा 3-0 असा जिंकू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे खेळाडू नसल्याने त्यांचे सामने जिंकणे मुश्किल आहे”, असेही ते पुढे म्हणाले.

भारत यावर्षी दोन कसोटी मालिकेत पराभूत झाला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून 2-1 आणि इंग्लंडकडून 4-1 असा पराभूत झाला असला तरी भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगली कामगिरी करण्याची शक्यता जोन्स यांनी व्यक्त केली आहे.

पहिला कसोटी सामना 6 डिसेंबर अॅडलेड येथे खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: रशीद खानच्या धोनी स्टाईलने विरेंद्र सेहवाग झाला अचंबित

या कारणामुळे बीसीसीआय नाराज, धोनीसाठी धोक्याची घंटा

टीम इंडियाला मोठा झटका, पृथ्वी शाॅ पहिल्या कसोटीतून बाहेर