शून्य धावेवर आऊट होऊनही विराटने हा विक्रम केला

गुवाहाटी । काल भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात पराभूत झाला. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली शून्य धावेवर बाद झाला. तरीही या खेळाडूने काल एक खास विक्रम आपल्या नावे केला.

विराट कोहली काल संपूर्ण टी२० कारकिर्दीत प्रथमच शून्य धावेवर बाद झाला. तर भारतीय कर्णधार म्हणून आजपर्यंत एकही खेळाडू शून्य धावावेवर बाद झाला नव्हता. भारतीय संघ आजपर्यंत ८५ सामने खेळला असून काल प्रथमच भारतीय कर्णधार शून्य धावेवर बाद झाला.

विराट कोहलीचा हा ५२ वा टी२० सामना होता. यापूर्बी हा खेळाडू कधीही शून्य धावेवर टी२०मध्ये बाद झाला नव्हता. त्यामुळे पहिल्यांदा शून्य धावेवर बाद होण्यापूर्वी विराट तब्बल ४७ डाव खेळला आहे.

पहिल्यांदाच शून्य धावेवर बाद होण्यापूर्वी सर्वाधिक डाव खेळणारे खेळाडू (टी२०)
४७- विराट कोहली
४०- शोएब मलिक
३९- युवराज सिंग