होळकर मैदान भारतासाठी कायम लकी !

इंदोर । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना उद्या इंदोरच्या होळकर स्टेडियम येथे होत असून हा या मैदानावरील ६वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. असे जरी असले तरी हे मैदान भारतासाठी कायमच लकी ठरले आहे.

अशा या मैदानाचा हा छोटासा इतिहास-

-भारतीय संघ या मैदानावर ४ वनडे सामने खेळला असून चारही सामने जिंकला आहे.

– भारतीय संघ येते एकमेव कसोटी सामना खेळला असून तो सामनाही भारताने जिंकला आहे.

-शेवटच्या दोनही आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर हा पुरस्कार भारतीय कर्णधाराने पटकावला आहे.

-महान फलंदाज वीरेंद्र सेहवागने ८ डिसेंबर २०११ साली याच मैदानावर २१९ धावांची तडाखेबंद वनडे खेळी केली होती. विशेष म्हणजे तेव्हा सेहवाग संघाचा कर्णधारही होता.

-भारतीय कर्णधार विराट कोहलीने ८ ऑक्टोबर २०१६ रोजी याच मैदानावर न्यूझीलँड संघाविरुद्ध २११ धावांची खेळी केली होती.

-माजी कॅप्टन कूल धोनीने या मैदानावर खेळताना १४ ऑक्टोबर २०१५ रोजी ९२ धावा केल्या होत्या. या सामन्यातही धोनी सामनावीर होता.