अमीर खानला माहित नाही भारतीय महिला संघाच्या कर्णधाराचे नाव !

बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणार अमीर खान काल हैद्राबादमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्याला हजार होता. अमीर नवीन चित्रपट ‘सिक्रेट सुपरस्टार’ याच्या प्रमोशनसाठी आला होता.

अमिरचे दुर्दैव म्हणजे कालचा सामना पावसामुळे रद्द झाला. सामन्याच्या वेळानंतर चर्चा सत्रात अमीर खान आणि चित्रपटातील सहकारी झैर वासिम, समालोचक जतीन सप्रू आणि माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांच्याशी बोलले.

काही वेळ चित्रपटाबद्दल बोलल्यानंतर जतीनने आमिरला भारतीय पुरुष संघाबद्दल आणि महिला संघाबद्दल विचारले असता आमिर थोडा गोंधळला आणि त्याला या गोंधळात भारताच्या महिला संघाच्या कर्णधाराचे नावही सांगता आले नाही. झैरला पण या प्रश्नाचे उत्तर आले नाही.

अमीर म्हणाला “मला नाव माहित आहे पण मला आता ते लक्षात येत नाही.”

शेवटी जतीनने स्वतः याचे उत्तर सांगितले.