ब्रेकिंग- तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा, तीन खेळाडूंना वगळले

मेलबर्न | उद्या (२६ डिसेंबर) पासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यासाठी संघातून केएल राहुल, उमेश यादव आणि मुरली विजय यांना वगळण्यात आले आहे तर मयांक अगरवाल, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांची संघात निवड झाली आहे.

दुसऱ्या कसोटीत दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या रोहित शर्माही या कसोटीत कमबॅक करणार आहे.

मयांक अगरवालबरोबर या कसोटीत हनुमा विहारी सलामीला खेळताना दिसेल तर मधल्या फळीत मुंबईकर रोहित शर्मा खेळेल.

आर अश्विन अजूनही दुखापतीमधून सावरला नसल्यामुळे जडेजा मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. दुसऱ्या कसोटीत फिरकी गोलंदाज न खेळवणे टीम इंडियाला चांगलेच महागात पडले होते.

दुसऱ्या कसोटीत संघात स्थान देण्यात आलेल्या उमेश यादवलाही या सामन्यातून वगळण्यात आले आहे.

अशी आहे टीम इंडिया- 

हनुमा विहारी, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

महत्त्वाच्या बातम्या:

एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात मोठी खुशखबर

कुटुंबाने केलेल्या त्यागाचे, कष्टाचे महाराष्ट्र केसरी बाला रफीकने केले चीज…

संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी