टीम इंडियाचा अपमान करणाऱ्या आॅस्ट्रेलियन मीडियाला सुनावले आॅस्ट्रेलियन नागरिकांनी खडेबोल

भारतीय संघ सध्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांची आॅस्ट्रेलिया विरुद्ध 6 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेआधी नेहमीप्रमाणे आजी-माजी खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली आहे.

असे असले तरी कोणत्याही खेळाडूने कोणतीही अपमानास्पद वक्तव्य केलेले नाही. पण आॅस्ट्रेलियाच्या मीडियाने मात्र भारतीय संघाबाबत अपमानास्पद शब्द वापरले आहेत. परंतू चांगली गोष्ट अशी की तेथील आॅस्ट्रेलियन नागरिकांनी त्यांच्या मीडियाला सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा कृतीबद्दल चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

आॅस्ट्रेलियाच्या एका वर्तमानपत्रात भारतीय संघाला ‘भयभीत झालेले खेळाडू असे म्हटले आहे. तसेच या वृत्तात म्हटले आहे की भारतीय संघाला ब्रिस्बेन मधील उसळत्या खेळपट्टीची, पर्थमधील अनोळखी खेळपट्टीची तर अॅडलेडमध्ये दिवस-रात्र कसोटी खेळण्याची भिती आहे. कारण भारताने अॅडलेडमध्ये दिवस-रात्र कसोटी खेळण्याच्या क्रिकेट आॅस्ट्रेलियाची विनंती नाकारली होती.

पण या वृत्ताबद्दल आॅस्ट्रेलियन नागरिकांना वाईट वाटले असून त्यांनी आॅस्ट्रेलियाच्या मीडियाला चांगलेच धारेवर धरले आहे.

आॅस्ट्रेलियन चाहत्यांनी यावर्षी मार्च महिन्यात चेंडू छेडछाड प्रकरणानंतरही आॅस्ट्रेलियाच्या संघावर टीका केली होती.

तसेच आॅस्ट्रेलियाच्या मीडियाने याआधीही असे कृत्य केले आहे. जेव्हा 2017 मध्ये आॅस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला होता तेव्हा त्यावेळीचा आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने ड्रेसिंग रुमकडे पहात डीआएसची मागणी केली होती, त्यामुळे हे ब्रेनफेड प्रकरण चांगलेच गाजले होते. तेव्हाही विराटला क्रिकेटमधील डोनाल्ड ट्रम्प असे आॅस्ट्रेलियन मीडियाने संबोधले होते.

भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला कसोटी सामना अॅडलेड येथील अॅडलेड ओव्हल मैदानावर 6 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: आघाडी घेतल्यावर फ्रान्सला स्पेन विरुद्ध मानावे लागले बरोबरीत समाधान

वाढदिवस विशेष: भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजबद्दल या खास गोष्टी माहिती आहेत का?

एकाच जागी, एकाच ओव्हरमध्ये ६ षटकार मारणारा १९ वर्षीय युवराज सिंग, पहा व्हिडीओ…