चेतेश्वर पुजाराला संघसहकारी का म्हणतात ‘व्हाइट वॉकर’

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाकडून मोलाची कामगिरी बजावणाऱ्या चेतेश्वर पुजाराने त्याचा फॉर्म कायम राखत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीमध्येही 193 धावांची खेळी केली आहे.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना 622 धावांवर डाव घोषित केला आहे.

सिडनी कसोटीत दिडशतकी खेळी करणाऱ्या पुजाराला त्याच्या संघसहकाऱ्यांनी ‘व्हाइट वॉकर’ हे टोपननाव दिले आहे. ‘व्हाइट वॉल्कर’ हे गेम ऑफ थ्रोन्स या टीव्ही शोमधील एक खलनायकी पात्र आहे. हे पात्र जेथे जाईल तेथे प्रतिस्पर्धी समोर नेहमीच अडचणी निर्माण करतो.

पुजाराने बीसीसीआय टीव्हीशी बोलताना या टोपननावापाठीमागचा खुलासा केला आहे.

“माझ्या मते हे नाव मला आर अश्विन आणि बासू सर (शंकर बासू) या दोघांनी मिळून दिले आहे. काही जणांनी ‘पुजारा इझ कमिंग, पुजारा इझ कमिंग (पुजारा येत आहे, पुजारा येत आहे) असेही म्हणायला सुरुवात केली आहे, जे मजेदार आहे.”, असे पुजारा म्हणाला.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुजाराने 7 डावांमध्ये 74.43च्या सरासरीने 521 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 3 शतके आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

कुलदिप यादव असा पराक्रम करणारा केवळ दुसराच चायनामन गोलंदाज

रोहित शर्माच्या मुलीचे नाव ठरले!

टीम इंडियाच्या बाबतीत ती गोष्ट कधीच नाही घडली