क्रिकेट क्रिकेटसारखच खेळा, जोशात प्रामाणिकपणा सोडू नका

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 6 डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेआधी क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे नवीन अध्यक्ष अर्ल एडिंग्ज यांनी आॅस्ट्रेलिया संघाला जोषात खेळा पण प्रामाणिकपणे खेळा असा सल्ला दिला आहे.

आॅस्ट्रेलियन क्रिकेट वर्तुळात ‘पूर्ण प्रामाणिकपणा’ (एलिट आॅनेस्टी) हा शब्द मागील काही काळापासून खूप चर्चेत आहे. त्याचमुळे एडिंग्ज यांनी हे भाष्य केले आहे.

एडिंग्ज यांनी ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’मधील वृत्ताप्रमाणे म्हणाले, ‘जोशात आणि चांगले क्रिकेट खेळा. मला वाटत नाही की लोकांना आपल्याकडून शांत खेळण्याची अपेक्षा आहे. पण त्यांना खेळाप्रती आदर ठेऊन खेळण्याची अपेक्षा आहे. जोषात पण प्रामाणिकपणे खेळा. जिंकताना चांगले जिंका आणि हरले तरी चांगल्या पद्धतीने जिंका’

त्याचबरोबर ते असेही म्हणाले की ‘मला वाटते की आपला चांगला संघ आहे. तरुण खेळाडू आहेत आणि मला वाटते ते चांगले खेळतील.’

ते पुढे म्हणाले, ‘माझा तूम्हाला सल्ला असेल की जेव्हाही तूम्ही खेळायला जाणार तेव्हा नैसर्गिक खेळ खेळा. जेवढे चांगले खेळता येईल तेवढे खेळा. हीच आॅस्ट्रेलियाच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.’

यावर्षी मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध आॅस्ट्रेलिया संघात झालेल्या कसोटी मालिकेदरम्यानचे चेंडू छेडछाड प्रकरण गाजले होते. त्याच प्रकरणी दोषी अढळल्याने स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट या तीन खेळाडूंवर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची बंदीही घातली आहे.

त्यामुळे या प्रकरणी आॅस्ट्रेलियाच्या संघावर आॅस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी मोठी टिका केली आहे.

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड येथे होणारा पहिला कसोटी सामना दिवस-रात्र खेळवण्याची एडिंग्ज यांची आशा होती. परंतू भारताने यासाठी नकार दिला आहे. पण भविष्यात नक्किच दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जाईल, असे ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० जागा न मिळालेल्या धोनीची या स्पर्धेत चमकदार कामगिरी

Video: कर्णधार विराट कोहलीने विकेट घेत केले असे जबरदस्त सेलिब्रेशन

हॉकी विश्वचषक २०१८: आज पाकिस्तानसमोर तुल्यबळ जर्मनीचे आव्हान

हॉकी विश्वचषक २०१८: ‘स्पीडी टायगर’ मलेशिया समोर आज तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान

आॅस्ट्रेलियात भारतीय सलामीवीरांची धमाकेदार कामगिरी