Video: विराट कोहलीपाठोपाठ हार्दिक पंड्याचाही मैदानात डान्स

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात  आज (6 जानेवारी) पावसाच्या व्यत्ययामुळे 25.2 षटकांचाच खेळ होऊ शकला आहे. आज चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद 6 धावा केल्या आहेत.

या सामन्यात खेळ सुरू असताना भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या हा बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणासाठी आला होता. यावेळी काही भारतीय चाहते आणि भारत आर्मीचे काही सदस्य गाणं गुणगुणत असताना हार्दिकने त्याच्यावर नृत्यकला दाखवली.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या एशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक दुखापतग्रस्त झाला होता. यामुळे त्याला विंडीज विरुद्धच्या मालिकेसाठी संघाबाहेर बसावे लागले होते. तर त्याने शेवटचा कसोटी सामना ऑगस्टमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता.

हार्दिकच्या अगोदर भारतीय कर्णधार विराट कोहलीनेही अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी दरम्यान स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना डान्स करायला सुरुवात केली होती.

रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याकडून खेळताना हार्दिकने उत्तम कामगिरी केल्याने त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले. मात्र त्याला अंतिम अकरामध्ये जागा मिळाली नाही.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी न मिळाल्याने हार्दिक तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी उत्सुक आहे. 12 जानेवारीला पहिला वन-डे सामना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०१९ सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का

वाढदिवस विशेष: कपिल देव आणि ४ चेंडूत ४ षटकार…

चेतेश्वर पुजाराला संघसहकारी का म्हणतात ‘व्हाइट वॉकर’