Video: आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मुरली विजयला कोहलीबद्दल असे काही बोलला की ऐकून थक्क व्हाल!

पर्थ। भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर(16 डिसेंबर)दोन्ही संघांचे कर्णधार विराट कोहली आणि टीम पेनमध्ये शाब्दिक चकमक झाली होती.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पेनने विराट कोहली सोबतची शाब्दिक चकमक चौथ्या दिवशीही सुरूच ठेवली. मात्र यावेळी त्याने मुरली विजयलाही त्याचे लक्ष्य केले.

भारताकडून आज (17 डिसेंबर) विजयने दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना त्याला पेनने ‘तो (कोहली) तुमचा कर्णधार आहे पण तूला तो फारसा आवडत नसेल’, असे म्हटले आहे. पेनचे हे बोलणे स्टंम्पच्या माइकमध्ये रेकॉर्ड झाले.

चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 5 विकेट्स गमावत 112 धावावर केल्या आहेत. सामना जिंकण्यासाठी भारताला अजून 175 धावांची गरज आहे. हनुमा विहारी नाबाद 24 आणि रिषभ पंत 9 धावांवर खेळत आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सर्वबाद 243 धावा केल्या.

उद्या (18 डिसेंबर) या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस असून ऑस्ट्रेलियाचे उर्वरीत पाच विकेट्स घेत मालिका 1-1 अशी बरोबरी करण्याचे प्रयत्न असतील.

महत्त्वाच्या बातम्या:

कोहली-पेनमधील वाद काही मिटेना, अखेर मैदानावरील अंपायरनेच केली मध्यस्थी

कोणीही विचार केला नसेल अशा गावसकरांच्या नकोशा विक्रमाची केएल राहुलने केली बरोबरी

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कधीही न झालेली धावसंख्या टॉम लेथमने केली

एकीकडे टीम इंडिया धावांसाठी झगडत असताना हार्दिक पंड्याचा रणजी ट्राॅफीत धडका सुरुच