Video: कोहली-पेन सोडा पण टीम इंडियाचेच हे दोन खेळाडू भिडले मैदानावर…

पर्थ। आज(18 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाने ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध 146 धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळांडूमध्ये अनेक शाब्दिक चकमकी झाल्या. मात्र संघसहकाऱ्याबरोबर मैदानावर वाद होणे हे क्वचितच होते. या सामन्यातही तसेच काही झाले. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज इशांत शर्मा आणि रविंद्र जडेजा यांच्यात काही कारणास्तव वाद झाले. त्यावेळी दोघांना कुलदिप यादव आणि मोदम्मद शमी यांनी वेळीच रोखले.

दुसऱ्या कसोटीमध्ये जडेजाला अंतिम 11 जणांच्या संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे तो चौथ्या दिवशी बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणाला आला होता. तेव्हा डावाच्या ब्रेकमध्ये इशांत आणि जडेजा एकमेंकाकडे बोट करून काहीतरी बोलत होते. पण त्यांच्यात कशावरून वाद झाले होते हे मात्र स्पष्ट झाले नाही.

तसेच भारतीय कर्णधार विराट कोहलीने चार वेगवान गोलंदाज आणि कामचलावू फिरकी गोलंदाज हनुमा विहारी यांना पर्थ कसोटीसाठी अंतिम 11 जणांच्या संघात संधी दिली होती. हा निर्णय चुकला हे कोहलीने मान्यही केले आहे.

तसेच या सामन्यात कोहली- टिम पेन, पॅट कमिन्स- रिषभ पंत यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या आहेत.  पेनने दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या मुरली विजयलाही कोहलीवरून स्लेजिंग केले होते.

महत्तवाच्या बातम्या:

कोहलीचा ‘तो’ निर्णय चूकला आणि टीम इंडियाने सामना गमावला…

भारताविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेसाठी १३ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ जाहीर

कोहली-पेन वाद हा खिलाडूवृत्तीला धरूनच – जोश हेजलवूड