धोनी सामील होणार सचिन, द्रविड, गांगुलीच्या क्लबमध्ये

चेन्नई । भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या ५ वनडे सामन्यांच्या मालिकेत एक खास विक्रम करणार आहे. वनडे कारकिर्दीत १० हजार धावा करण्याचा विक्रम धोनी या मालिकेत करू शकतो.

भारतीय खेळाडूंपैकी वनडे सामन्यात १० हजार धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर(18426), सौरव गांगुली(11363) आणि राहुल द्रविड(10889) या दिग्गजांचा समावेश आहे.

३६ वर्षीय धोनी १७ सप्टेंबर रोजी चेन्नई येथे कारकिर्दीतील ३०२वा सामना खेळणार आहे. सध्या धोनीच्या नावावर ३०१ वनडे सामन्यात ५२.२०च्या सरासरीने ९६५८ धावा आहेत. त्याने जर या मालिकेत ३४२ धावा केल्या तर अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ १२वा खेळाडू बनणार आहे.

धोनीने वनडे कारकिर्दीत १० शतके आणि ६५ अर्धशतके केली असून नाबाद १८३ हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.

या खेळाडूंनी केल्या आहेत वनडे कारकिर्दीत १० हजार धावा

1. सचिन तेंडुलकर – 18,426 runs (463 सामने)

2. कुमार संगकारा – 14,234 (404)

3. रिकी पॉन्टिंग – 13,704 (375)

4. सनाथ जयसूर्या – 13,430 (445)

5. माहेला जयवर्धने- 12,650 (448)

6. इंझमाम उल हक- 11,739 (378)

7. जॅक कॅलिस – 11,579 (328)

8. सौरव गांगुली – 11,363 (311)

9. राहुल द्रविड- 10,889 (344)

10. ब्रायन लारा- 10,405 (299)

11. तिलकरत्ने दिलशान- 10,290 (330)