टीम इंडियाला तिसरी कसोटी जिंकायची असेल तर हा शिलेदार संघात हवाच- मायकल हसी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील चार कसोटी मालिकेतील तिसरा सामना मेलबर्न येथे 26 डिसेंबरला होणार आहे. या सामन्यासाठीची खेळपट्टी बघता भारतीय संघात हार्दिक पंड्याचा समावेश असावा असे ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल हसी म्हणाला आहे.

मेलबर्नच्या खेळपट्टीला आयसीसीकडून यापुर्वीच सुधारणा करण्याचा इशारा मिळाला असून मागील वर्षी येथे झालेला अॅशेसचा चौथा सामना अनिर्णीत राहिला होता.

“भारताने हार्दिकला संघात स्थान दिले तर अधिक गोलंदाज आणि फलंदाजही मिळेल. भारतीय वेगवान गोलंदाजांनी या मालिकेत उत्तम कामगिरी केली आहे”, असे हसी म्हणला.

भारताने चार गोलंदाजाबरोबर अॅडलेडचा सामना 31 धावांनी जिंकला. मात्र पर्थ येथे तो प्लॅन फसला. या सामन्यात भारताने संघात चार वेगवान गोलंदाज आणि कामचलावू गोलंदाज हनुमा विहारी यांना स्थान दिले होते.

“पर्थपेक्षा मेलबर्नची खेळपट्टी वेगळी आहे. पर्थ कसोटीमध्ये भारताला आर अश्विनची उणीव जाणवली तर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने या सामन्याचे चित्र पालटले”, असे हसी म्हणाला.

“दोन्ही संघांनी चार गोलंदाजांना घेऊन आधीचे दोन कसोटी सामने खेळले आहेत. मात्र आता दोघांनाही अष्टपैलू खेळाडूला संघात संधी देण्याची गरज आहे”, असेही हसी म्हणाला.

हसीने भारतीय सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली नाही तर नंतर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि कर्णधार विराट कोहली या तिघांवरची जबाबदारी वाढेल असेही म्हटले आहे.

43 वर्षीय हसीने 79 कसोटी सामन्यात 6235 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या या मोठ्या खेळाडूला संघातून डच्चू

गौतम गंभीरच टेन्शन वाढलं, दिल्ली न्यायालयाने बजावले समन्स

आयपीएलमध्ये निवड झालेल्या त्या दोन चुलत भावांच्या घरी रात्री उशीरापर्यंत सेलिब्रेशन