आॅस्ट्रेलियाला रिषभ पंत नडला, भावांनो तेथे सर्वजण काही पुजारा नाहीत

अॅडलेड। भारतीय कसोटी क्रिकेट संघात एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर रिषभ पंतने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र धोनी आणि त्याच्या स्वभावात खूप मोठा फरक आहे. हे सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून लक्षात येते.

भारताने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी भारताकडून चेतेश्वर पुजाराने 123 धावा करत संघाला 250 धावा करण्यास महत्त्वाची भुमिका पार पाडली.

ऑस्ट्रेलियाचीही सुरूवात भारताप्रमाणेच अडखळत झाली. त्यांच्याकडून उस्मान ख्वाजाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आर. अश्विन त्याला गोलदांजी करत असताना पंतचा ‘येथे काही सगळेच पुजारा नाही’ असे म्हटल्याचा आवाज स्टंपच्या माईकमध्ये ऐकायला मिळाला.

भारताच्या फलंदाजी दरम्यान पंत आणि पॅट कमिन्स यांच्यात काही शाब्दिक चकमक घडली होती. यामुळे त्याने ख्वाजाला लक्ष्य करत परतफेड केली.

ख्वाजानंतर ऑस्ट्रेलियाचे दोन विकेट्स झटपट पडल्याने ट्रेविस हेडने कमिन्सला साथीला घेत आॅस्ट्रेलियाचा हा डाव सावरत त्यांनी 50 धावांची 7 व्या विकेटसाठी भागीदारी रचली. ही भागीदारी तोडण्यात जसप्रीत बुमराहला यश आले. त्याने कमिन्सला 10 धावांवर असताना पायचीत केले.

आॅस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने एकाकी झुंज देताना 149 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 61 धावा केल्या असून तो दुसऱ्या दिवसाखेर नाबाद आहे. त्याच्या बरोबर मिशेल स्टार्क नाबाद 8 धावांवर खेळत आहे.

भारताकडून दुसऱ्या दिवसाखेर आर अश्विन(3/50), इशांत शर्मा(2/31) आणि जसप्रीत बुमराह(2/34) यांनी विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

ड्वेन ब्रावोच्या या अंदाजामुळे कोहलीच्या टीम इंडियाचे टेन्शन वाढले

आॅस्ट्रेलियाच्या कर्णधाराची विकेट घेत इशांत शर्माने केला मोठा पराक्रम

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: ट्रेविस हेडच्या नाबाद अर्धशतकाने सावरला आॅस्ट्रेलियाचा अडखळता डाव