दुसऱ्या कसोटी सामन्यात हे खेळाडू टीम इंडियाकडून येणार सलामीला

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून पर्थ येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारताकडून सलामीला कोण येणार याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र या सामन्यातही केएल राहुल आणि मुरली विजय ही जोडी सलामीला खेळणार हे जवळपास निश्चित आहे.

पृथ्वी शॉ हा त्याच्या दुखापतीमुळे अॅडलेड कसोटी सामन्यास मुकला होता. त्याला झालेली दुखापत अजूनही ठीक झाली नसून तो पूर्णपणे बरा झाला नाही. त्याने अॅडलेड कसोटी दरम्यान भारताचा दुसरा डाव सुरु होण्याआधी फिटनेस टेस्ट दिली होती.

काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माहिती दिली होती की त्याच्या प्रकृतीत प्रगती होत असून तो मेलबर्न येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी संघात पुनरागमन करु शकतो.

शॉ आॅस्ट्रेलिया एकादश विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या सराव सामन्यात शुक्रवारी(30 नोव्हेंबर) दुखापतग्रस्त झाला होता. तो या दुखापतीतून 100%बरा झाला नसल्याने राहुल आणि विजय या दोघांना अजून एक संधी मिळाली आहे.

या सामन्यात शॉला क्षेत्ररक्षण करताना बाउंड्री लाइनच्या जवळ मिड-विकेटला असताना झेल घेण्याच्या प्रयत्नात डाव्या पायाच्या घोट्याची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला लगेचच दवाखान्यात नेण्यात आले होते. त्याला मैदानातूनही भारतीय संघाच्या मेडिकल टीमने अक्षरश: उचलुन ड्रेसिंगरुममध्ये नेले होते.

तसेच राहुल आणि विजय हे दोघे अॅडलेड कसोटी सामन्यात पहिल्या डावात चांगली सुरूवात करण्यास अपयशी ठरले होते. दुसऱ्या डावात राहुलने 44 धावांची करत विजय सोबत 63 धावांची भागीदारी केली होती. यामुळे भारतीय संघाची सलामीची फलंदाजी चिंतेचा विषय बनली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

एकवेळ मुंबईकडून आयपीएल गाजवणार खेळाडू यावर्षी आयपीएल खेळणारच नाही

शास्त्रींना प्रशिक्षक पदाववर नेमण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा बीसीसीआयवर मोठा आरोप

१८ वर्षीय गोलंदाजाचा कूच बिहार ट्रॉफीत अनोखा पराक्रम