मेलबर्न कसोटीआधी टीम इंडियासाठी ही आहे आनंदाची बातमी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात मेलबर्न येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याला 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 असे बरोबरीत आहेत.

या सामन्यासाठी अष्टपैलू रविंद्र जडेजा फिट असल्याचा निर्वाळा बीसीसीआयने दिला आहे.

बीसीसीआयच्या रिपोर्टनुसार, जडेजाला विंडीज विरुद्धच्या वन-डे मालिकेत डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला 2 नोव्हेंबरला डॉक्टरांनी सांगितलेले  इंजेक्शन देण्यात आले होते. यामुळे तो आता फिट आहे.

या दुखापतीतून सावल्यावर तो सौराष्ट्रकडून 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान रणजी ट्रॉफीचे सामने खेळला. यामध्ये त्याने 64 षटके टाकली. त्यामुळेच जडेजाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात जागा दिली गेली.

जडेजाला 30 नोव्हेंबरला दुसरे इंजेक्शन दिल्याने तो पूर्णपणे फिट नव्हता म्हणून संघनिवड अधिकाऱ्यांनी त्याला पर्थ कसोटीसाठी अंतिम अकरामध्ये स्थान दिले नव्हते. त्याने या सामन्यात बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षण केेले होते.

जडेजाचा खांदा आता पूर्णपणे बरा झाला असून तो मेलबर्न कसोटीसाठी फिट आहे, असे बीसीसीआयच्या रिपोर्टमध्ये दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

या ५ कारणांमुळे रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीत येणार ओपनिंगला

Maharashtra Kesari: बुलढाण्याचा बालारफिक शेख महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी

अंपायरच्या त्या निर्णयामुळे कर्णधार चिडला, सामना ८ मिनीटे थांबवला

विजय- राहुलला डच्चू, हे दोन खेळाडू करणार टीम इंडियाची ओपनिंग ?