रिषभ पंतच्या रूपाने टीम इंडियाला मिळाला ऍडम गिलख्रिस्ट…

सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने पहिल्या डावात नाबाद 159 धावांची खेळी केली आहे.

‘पंतच्या या खेळीने भारतीय संघाला त्यांचा अॅडम गिलख्रिस्ट मिळाला आहे’, असे विधान दिग्गज भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पॉटींग यांनी केले आहे.

“पंतने चांगलीच फलंदाजी केली आहे. मात्र त्याला यष्टीरक्षणामध्ये बऱ्याच सुधारणा करण्याची गरज आहे”, असे अझरूद्दीन म्हणाले.

अझरुद्दीन यांनी पंतला मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी संघामध्ये स्थान द्यावे असेही संघनिवड समितीला सुचविले आहे.

“पंत एक उत्तम फलंदाज आहे. पण त्याला यष्टीरक्षणामध्ये सुधारणा करावी लागेल. आपण नेहमीच भारतीय संघाकडून यष्टीरक्षक म्हणून एमएस धोनीची चर्चा करत आलो आहोत. त्याने 90 कसोटी सामने खेळताना फक्त 6 शतके केली आहेत. तर पंत अधिक शकते करू शकतो”, असे पॉटींगने cricket.com.au ला सांगितले.

पंतने आतापर्यंत 9 कसोटी सामन्यात खेळताना 2 शतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

या संघसहकाऱ्यामुळे रिषभ पंतने केली दिडशतकी खेळी

रिषभ पंतच्या त्या विक्रमाची चर्चा आजही देशात सुरुच

म्हणून भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सिडनी कसोटीदरम्यान पिंक कॅप दिल्या ग्लेन मॅकग्राला