भारतीय क्रिकेटरने केलेलं असलं स्लेजिंग तुम्ही यापुर्वी कधीही पाहिलं नसेल

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात ७६व्या षटकांत आॅस्ट्रेलियाची ६ बाद १६१ अशी अवस्था होती आणि पॅट कॅमिन्स आणि टीम पेन मैदानावर होते. ११ चेंडूत ० धावा केलेला पॅट कमिन्स चांगला खेळत होता. परंतु यावेळी टीम इंडियाचा नवा भिडू रिषभ पंत पॅट कमिन्सला चांगला डिवचताना दिसला.

यावेळी स्टंप्सवरील कॅमेऱ्यात हे स्लेजिंग रेकाॅर्ड झालं होत. “कमआॅन पॅटी, जरा षटकार वगैरे दिसू देत. इथे टिकून राहणं अवघड आहे पॅटी. षटकार चौकारांचे बाॅलही तू खेळत नाहीस. ” असे यावेळी पंत कमिन्सला म्हणताना दिसला.

महत्त्वाच्या बातम्या:

जे कोणत्याही आशियाई कर्णधाराला जमले नाही ते विराट कोहलीने करुन दाखवले!

अॅडलेड कसोटी जिंकत विराट कोहलीच्या टीम इंडियाने घडवला इतिहास

अॅडलेड कसोटीत यष्टीरक्षक रिषभ पंत चमकला, केले हे खास विक्रम