बाप’माणूस रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर

सिडनी | भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि कसोटी संघात मोठी संधी मिळालेला रोहित शर्मा सिडनी कसोटीपुर्वीच भारतात परतणार आहे. रोहित शर्माला कालच कन्यारत्न प्राप्त झाले आहे.

भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. याच कसोटी रोहितने ६३ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात मोठा हातभार लावला होता.

सिडनी कसोटीत भारतीय संघ विजय मिळवून मालिका ३-१ अशी जिंकण्यासाठी उत्सुक आहे. यामुळे रोहितच्या जागी आता संघव्यवस्थापन कुणाला संधी देते हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या:

कमी सामन्यात कर्णधार राहुन कोहली विक्रमांत धोनी- गांगुलीच्या पुढे

बुमराह पॅटर्न लईच वाईट, आफ्रिका, इंग्लड आणि आता ऑस्ट्रेलिया, कुणालाच समजला नाही

बुमराह एक, पराक्रम अनेक- भारताच्या या शिलेदाराचे भीमपराक्रम पहाच