२० वर्षापूर्वी केलेल्या मास्टर ब्लास्टरच्या त्या विक्रमाला विराट कोहली देणार धक्का ?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात मेलबर्न येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याला 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 असे बरोबरीत आहेत.

या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

विराटने यावर्षी 11 शतके केली असून सचिनने एका वर्षात 12 शतके केली आहेत. यामुळे सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी विराटला एक शतक करण्याची गरज आहे. सचिनने हा विक्रम 1998ला केला आहे.

तसेच विराटने या सामन्यात 181 धावा केल्या तर एका वर्षात सर्वाधिक धावा करण्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू रिकी पॉटींगला मागे टाकू शकतो.

पॉटींगने 2005ला 46 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना 56.66च्या सरासरीने 2833 धावा केल्या आहेत. तर विराटने यावर्षी 36 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना 69.81च्या सरासरीने 2653 धावा केल्या आहेत. यामध्ये नाबाद 160 ही विराटची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

मेलबर्न कसोटीआधी टीम इंडियासाठी ही आहे आनंदाची बातमी

चक्क ७ वर्षांचा चिमुकला मेलबर्न कसोटीत असणार आॅस्ट्रेलियाचा कर्णधार

क्यूरेटरकडून झालेल्या त्या चूकीमुळे सामन्याला झाला तब्बल अडीच तास उशीर

वनडेत संधी मिळाली नाही तर पुजारा-रहाणे या संघाकडून खेळणार तीन मालिका