एकही सामना न खेळलेल्या राहुलची निवड होते परंतु ४ अर्धशतके करणाऱ्या रहाणेला का संघात स्थान नाही?

0 543

अजिंक्य रहाणेच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेत समावेश न करण्यावरून माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी निवड समितीचा चांगलाच समाचार घेतला आहे.

त्यांनी ५ सामन्यात ४ शतके करणाऱ्या अजिंक्य रहाणेला संघात स्थान न देण्यावरून निवड समितीची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. तसेच केएल राहुलच्या समावेशाबद्दल शंका व्यक्त केली.

गावसकर म्हणाले, ” ज्या खेळाडूने सलग चार अर्धशतके केली आहेत त्या खेळाडूला संघात स्थान का देण्यात आले नाही. केएल राहुल एक चांगला खेळाडू आहे परंतु तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही सामना खेळला नाही मग त्याला संघात स्थान कसे देण्यात आले आहे.”

शिखर धवनच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रहाणेने अतिशय चांगली कामगिरी करत ५ सामन्यात ५, ५५, ७०, ५३ आणि ६१ धावा केल्या होत्या. रहाणेला विंडीज मालिकेत मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

Comments
Loading...
%d bloggers like this: