आॅस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिका हा संघ जिंकणार, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. तर तिसरा सामना 26 डिसेंबरला मेलबर्न येथे होणार आहे.

ही मालिका भारतच जिंकणार असे विधान माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने केले आहे.

“भारत ही मालिका 3-1 अश्या फरकाने जिंकणार आहे. ऑस्ट्रेलिया संघात स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नर हे फलंदाज खेळत नसल्याने भारतीय संघात विजय मिळवण्याचा आत्मविश्वास आहे”, असे लक्ष्मण आजतकला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

याआधी लक्ष्मणने इंग्लंड विरूद्धही 4-1 असा भारतीय संघाच्या पक्षात निकाल लागणार असे वक्यव्य केले होते.

“भारत इंग्लंड विरुद्ध पराभूत झाला असला तरी भारतीय संघामध्ये जिंकण्याची क्षमता अजूनही आहे”, असेही लक्ष्मण पुढे म्हणाला.

भारताने अॅडलेड येथे झालेला पहिला सामना 31 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली होती. तर पर्थ येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी 146 धावांनी मोठा पराभव स्विकारावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या:

कोहलीच्या आक्रमक स्वभावाचे विंडिजच्या दिग्गज फलंदाजाने केले समर्थन…

मेलबर्न कसोटीआधी रविवारपर्यंत टीम इंडियाच्या सरावाला सुट्टी…

पर्थ खेळपट्टीवरुन भारत-आॅस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंमध्येच झुंपली भांडणे