काय आहे कोलकाता वनडेची सद्यस्थिती !

कोलकाता । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना उद्या कोलकात्यातील इडन गार्डन मैदानावर होत आहे. हा या मैदानावरील ३०वा वनडे सामना ठरणार आहे. ह्या सामन्यावर पावसाचे सावट आहे.

आज तिसऱ्या दिवशीही आतापर्यंत येथे कोणत्याही संघाने सराव केलेला नाही. संपूर्ण मैदानावर कव्हर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे दोनही संघाना इडन गार्डन मैदानातील इनडोअर मैदानात सराव करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत.

कोलकाता वेधशाळेने २१ तारखेला मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज अर्थात २० तारखेला सकाळी आकाश स्वच्छ होते. ग्राउंड स्टाफ मैदान दुसऱ्या वनडे सामन्यासाठी तयार होण्यासाठी कष्ट घेत आहे परंतु जर सामना झाला नाही तर हे सर्व कष्ट वाया जाणार आहेत.

मैदानाला शेवटचा फिनिशिंग टच देणेही पावसामुळे शक्य झाले नाही. मैदान सुखण्यासाठी थोड्या सूर्यप्रकाशाची गरज आहे.चाहते २१ तारखेला पाऊस होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.

कोलकाता शहरात उद्यापासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार असून संपूर्ण शहर हा सामना आणि नवरात्रासाठी सजले आहे. परंतु हा जर सामना झाला नाही तर चाहत्यांना मोठया प्रमाणावर निराशेचा सामना करावा लागणार आहे.

यदाकदाचित आपणास माहित नसेल तर-
गेल्या वर्षी बंगाल क्रिकेट असोशिएशनचा अध्यक्ष या नात्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर या माध्यमातून गांगुलीने अतिशय चांगले काम केले आहे. हा सामना यशस्वी होण्यासाठी गांगुली पूर्ण प्रयत्न करणार असेल. देशात सार्वधिक कसोटी आणि वनडे या मैदानावर झाले आहेत. या मैदानावर आजपर्यंत ४० कसोटी आणि २९ वनडे सामने झाले आहेत.