बांगलादेशने कंबर कसली; आकडेवारी मात्र भारताच्या बाजूने

एशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात आज(28 संप्टेंबर) होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत  स्पर्धेत आपली छाप सोडली आहे.

सुपर फोरच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशने पाकिस्तानला हरवले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशच्या संघाला हलक्यात घेण्याची चुक करणार नसल्याचे भारतीय संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर शिखर धवनने म्हटले आहे.

बांग्लादेशच्या संघाने देखील अंतिम सामन्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे चुरशीच्या सामन्याची अपेक्षा आहे.

या सामन्याती आकडेवारी भारताच्या बाजूने असल्याने संघाचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे.

खेळ आकड्यांचा-

4- भारताचा जलगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला आपल्या 100 वन-डे विकेट पुर्ण करण्यासाठी 4 विकेटचा आवश्यकता आहे. त्यानंतर तो असा पराक्रम करणारा 12 वा भारतीय वेगवान गोलंदाज ठरेल.

7- जर आजच्या सामन्यात भारत जिंकला तर भारत 7 व्यांदा एशिया कप जिंकणारा संघ ठरेल.

87- महेंद्रसिंग धोनीला वन-डे क्रिकेटमध्ये भारताकडून 10,000 धावा पुर्ण करण्यासाठी 87 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतर धोनी हा असा पराक्रम करणारा चौथा भारतीय ठरेल. याआधी सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी अश्या प्रकारचा कामगिरी केली आहे.

223- पहिल्यांदा फलंदाजी करतानाची  दुबईतील या मैदानावरची  सरासरी धावसंख्या 223 आहे.

60%- या मैदानावर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने  60 टक्के सामने जिंकले आहेत. (मागील 10 डावात).

210- दुबईच्या या मैदानावरील सर्वोच्च भागिदारी भारताच्या शिखर धवन आणि रोहित शर्माच्या नावावर आहे. याच स्पर्धेत सुपर फोरच्या सामन्यात पाकिस्तानविरूद्ध हा पराक्रम केला आहे.

6/38- या मैदानावर एका डावात सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद अफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध  2009 साली 38 धावा देत 6 गडी बाद केले होते.

1- भारताला सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आपले 700 विजय पुर्ण करण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे.

0- ढाका सोडता, बांग्लादेशने भारताविरूद्ध अशिया चषकात एकही विजय मिळवलेला नाही.

1- बांग्लादेशचा कर्णधार मशरफी मोर्तुझाला आपल्या आंतरराष्ट्रीय वन-डे 250 विकेट पुर्ण करण्यासाठी एका विकेटची आवश्यकता आहे.

33- सौम्या सरकारला वन-डेत 1000 धावा पुर्ण करण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे.

1-एशिया कप स्पर्धेत भारत आणि बांग्लादेश यांच्यात आतापर्यंत झालेल्या 13 सामन्यात बांग्लादेशने फक्त एक विजय मिळवला आहे.

2-  भारत आणि बांग्लादेश हे दोन्ही संघ सलग दुसऱ्यांदा एशिया कपचा अंतिम सामना एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत.  2016 एशिया कप स्पर्धेतील ढाका येथे झालेला अंतिम सामना भारताने 8 विकेटने जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठमोळा रिशांक देवाडीगा करणार यूपी योद्धाचे नेतृत्व

एशिया कपमधील खराब कामगिरीचा मला बळीचा बकरा बनवले गेले

कोरिया ओपनच्या उपउपांत्यपुर्व सायनाचा धडाक्यात प्रवेश