टीम इंडियाच्या या ११ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

दुबई। 28 सप्टेंबरला एशिया कप 2018 चा अंतिम सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. या सामन्यात भारताने 3 विकेट्सने विजय मिळवून सातव्यांदा एशिया कपवर आपले नाव कोरले.

भारताचा या एशिया कपच्या अंतिम सामन्यातील विजय हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 700 वा विजय होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम याआधी फक्त आॅस्ट्रेलिया आणि इंग्लडेने केला आहे.

भारताने 700 सामन्यातील विजयांपैकी कसोटीत 146 सामने, वनडेत 489 सामने आणि टी20 मध्ये 65 सामने जिंकले आहेत.

याबरोबर भारतीय संघाने अनेक खास विक्रमही केले. त्यातील काही खास- 

एशिया कपचे विजेतेपद सर्वाधिक वेळा जिंकणारे संघ
७- भारत (१ टी-२०)
५- श्रीलंका
२- पाकिस्तान

भारताला एशिया कप विजेतेपद मिळवुन देणारे कर्णधार
१९८४- सुनिल गावसकर
१९८८- दिलीप वेंगसकर
१९९०- मोहम्मद अझरुद्दीन
१९९५- मोहम्मद अझरुद्दीन
२०१०- एमएस धोनी
२०१६- एमएस धोनी (टी-२०)
२०१८- रोहित शर्मा

यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारे यष्टीरक्षक
९९८- मार्क बाऊचर
९०५- अॅडम गिलख्रिस्ट
८००- एमएस धोनी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यष्टीचीत करणारे यष्टीरक्षक-
184 – एमएस धोनी
139 – कुमार संगकारा
101 – रोमेश कालूवितरना

एशिया कपमध्ये वनडेत यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारे यष्टीरक्षक-
36 – एमएस धोनी
36 – कुमार संगकारा
17 – मोईन खान

कर्णधार म्हणुन रोहित शर्मा
पहिले आयपीएल विजेतेपद
पहिले चॅंपियन्स लीग टी२० विजेतेपद
पहिली वनडे मालिका विजेतेपद
पहिली टी२० मालिका विजेतेपद
पहिली तिरंगी मालिका विजेतेपद
पहिला एशिया कप विजेतेपद

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विजय मिळवणारे संघ
९९५- आॅस्ट्रेलिया
७६७- इंग्लंड
७००- भारत

सध्या भारताकडे आहेत या मोठ्या स्पर्धांची विजेतेपदं
१- ६० षटकांच्या विश्वचषकाचे विजेतेपद
१- ५० षटकांच्या विश्वचषकाचे विजेतेपद
१- २० षटकांच्या विश्वचषकाचे विजेतेपद
२- चॅंम्पियन्स ट्राॅफी
७- एशिया कप
१- आयसीसी कसोटी अव्वल क्रमांकाची मेस (गदा)

एशिया कपचे आजपर्यंतचे विजेते
भारत- 1984, 1988, 1990, 1995, 2010, 2016, 2018
श्रीलंका- 1986, 1997, 2004, 2008, 2014
पाकिस्तान- 2000, 2012

कर्णधार म्हणुन रोहित शर्माची आजपर्यंत कामगिरी
३- आयपीएल ट्राॅफी
१- चॅंमियन्स ट्राॅफी टी२०
१- निदाहास ट्राॅफी टी२०
१- एशिया कप

पहिल्या ८ वनडे सामन्यानंतर कर्णधार म्हणुन कामगिरी
विराट: विजय-७, पराभव- १
रोहित: विजय-७, पराभव- १

महत्त्वाच्या बातम्या-

केदार जाधवने विजयी धाव घेत टीम इंडियाला मिळवून दिले सातव्यांदा एशिया कपचे विजेतेपद

आशिया कपमधील खराब कामगिरीचा मोहम्मद आमिरला मोठा फटका