हार्दिक पंड्या म्हणतो मला कधीही कपील देव व्हायचे नव्हते

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने त्याची तुलना कपील देव यांच्याशी करु नका असे बजावत त्याच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे.

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात पंड्याची निराशाजनक कामगिरी झाली होती. पण तिसऱ्या कसोटीत मात्र पहिल्या डावात 28 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडचा डाव 161 धावांवर संपूष्टात आणण्यात मोलाचा वाटा उचलला.

या कामगिरी नंतर बीसीसीआयशी बोलताना पंड्या म्हणाला, “समस्या अशी आहे की ते कपील देव यांच्याशी तुलना करतात. पण जेव्हा काही चुकीचे होते तेव्हा ते म्हणतात तो तसा नाही. मला कधीही कपील देव व्हायचे नाही. मला हार्दिक पंड्या राहायचे आहे.मी असाच चांगला आहे.”

“मी इथपर्यंत पोहचलो आहे. मी 40 वनडे आणि 10 कसोटी सामने कपील देव म्हणून नाही तर हार्दिक पंड्या म्हणून खेळलो आहे. ते त्यांच्या काळात महान होते. मला हार्दिक पंड्या राहुदे. माझी आणि त्यांची तुलना करणे बंद करा. मी आनंदी आहे जर तूम्ही नसाल तर थँक्यू.”

पंड्याच्या इंग्लंड दौऱ्यातील कामगिरीवर भारताच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली होती. त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यात 90 धावा आणि 3 विकेट्स घेता आल्या होत्या.

या टीकेबद्दल पंड्या म्हणाला, “पहिली गोष्ट म्हणजे मी त्यांच्यासाठी खेळत नाही. ते जे काही म्हणतात त्यासाठी त्यांना पैसे मिळतात. मला ते काय म्हणतात हे जाणूनही घ्यायचे नाही आणि मी त्याची काळजी करतही नाही.”

“मी माझ्या देशासाठी खेळतो. असे बोलने हे त्यांचे काम आहे आणि माझे माझ्या देशासाठी खेळणे हे काम आहे. मी बरोबर गोष्टी करत आहे आणि माझा संघ माझ्यासाठी आनंदी आहे. त्यामुळे बाकी गोष्टींचा फरक पडत नाही.”

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहलीने माजी कर्णधार अझरचा २७ वर्ष जुना विक्रम मोडला

या कारणामुळे रहाणे तिसऱ्या कसोटीत चमकला

मुंबईकडून ९९ प्रथम श्रेणी सामने खेळणारा नायर आता पाँडिचेरीकडून खेळणार रणजी सामने