आजपासून सुरु होत असलेल्या भारत- इंग्लंड वनडे मालिकेबद्दल सर्वकाही

नॉटिंगहॅम। गुरुवार, 12 जुलैपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताने या मालिकेआधी इंग्लंड विरुद्ध पार पडलेली टी20 मालिका 2-1 अशी जिंकली आहे. 

पुढच्या वर्षी इंग्लंडमध्येच विश्वचषक होणार असल्याने त्या दृष्टीने भारतीय संघासाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे.

भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ मागील काही महिन्यांपासून वनडेमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहेत. इंग्लंडने नुकतेच आॅस्ट्रेलिया विरुद्ध 5 वनडे आणि 1 टी20 जिंकून आॅस्ट्रेलियाला व्हाइटवॉश दिला आहे. तर भारताने जून 2017 पासून 32 वनडेमधील 24 सामने जिंकले आहेत.

इंग्लंड आणि भारत यांच्यात याआधी 96 वनडे सामने झाले आहेत. त्यातील 52 सामन्यात भारताने तर 39 सामन्यात इंग्लंडने बाजी मारली आहे. तसेच भारताने इंग्लंडमध्ये 38 वनडे सामने खेळले असुन त्यातील 15 सामन्यात विजय मिळवण्यात भारताला यश आले आहे. तर 19 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

इंग्लंडच्या संघात सध्या जॉस बटलर, जेसन रॉय, अॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्टो आणि इयॉन मॉर्गन यांसारखे खेळाडू आहेत. मागील काही सामन्यांपासून जेसन रॉय आफलातून फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने मागील 5 वनडे सामन्यात 2 शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.

त्याचबरोबर भारतीय खेळाडूंचाही जबरदस्त फॉर्म नुकत्याच पार पडलेल्या टी20 मालिकेतून दिसून आला आहे. कर्णधार विराट कोहली, केएल राहुल, रोहित शर्मा, शिखर धवन, एमएस धोनी, दिनेश कार्तिक आणि सुरेश रैना यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. गोलंदाजीची भिस्त कुलदिप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्यावर असेल.

या आधी इंग्लंड आणि भारत संघात जानेवारी 2017 मध्ये वनडे मालिका झाली आहे. यात भारताने 2-1 ने बाजी मारली होती. त्यामुळे आता भारत टी20 मालिकेप्रमाणेच वनडे मालिकेतही विजयाचा प्रयत्न करेल तर इंग्लंड भारताविरुद्ध पुनरागमन करण्याचा प्रयत्नाच असेल.

इंग्लंड विरुद्ध भारत कधी होणार आहे पहिला वनडे सामना?

इंग्लंड विरुद्ध भारत पहिला वनडे सामना 12 जुलै 2018 ला होणार आहे.

कोठे होईल इंग्लंड विरुद्ध भारत पहिला वनडे सामना?

इंग्लंड विरुद्ध भारत  पहिला वनडे सामना नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिजमैदानावर होणार आहे.

किती वाजता सुरु होईल इंग्लंड विरुद्ध भारत  पहिला वनडे सामना?

भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 5.00 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील  पहिल्या वनडे सामन्याला सुरुवात होईल.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना इंग्लंड विरुद्ध भारत  पहिला वनडे सामना पाहता येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत  पहिला वनडे सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?

sonyliv.com या वेबसाईटवर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामना ऑनलाइन पाहता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ:

भारत: विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, हर्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, सिद्धार्थ कौल, अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार.

इंग्लंड: इयान मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, मोईन अली, जो रूट, जेक बॉल, टॉम करन, अॅलेक्स हेल्स, लिआम प्लंकेट, बेन स्टोक्स, आदिल रशिद, डेव्हिड विली, मार्क वुड.

महत्त्वाच्या बातम्या:

-भारताचे माजी ७ दिग्गज खेळाडू टीम इंडियाच्या मदतीला?

-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणारा क्रिकेटर करणार क्रिकेटला अलविदा

-इशांत शर्माने सांगितला धोनी आणि कोहलीमधील फरक