भारताला वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात शनिवारी (14 जुलै) ला दुसरा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे.

भारताने नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिजमैदानावर झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे ही आघाडी कायम राखण्याचे भारताला आव्हान असणार आहे.

त्याचबरोबर इंग्लंडही या सामन्यातून मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

या सामन्यात भारताकडून कुलदिप यादव आणि रोहित शर्माने महत्त्वाची कामगिरी केली आहे. कुलदिपने 6 विकेट्स घेतल्या तर रोहितने शतक केले आहे.त्याचबरोबर इंग्लंडकडून बेन स्टोक्स आणि जॉस बटलरने अर्धशतक केले आहे.

भारत आणि इंग्लंडने मागील काही महिन्यांपासून वनडेमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

इंग्लंड आणि भारत यांच्यात याआधी 97 वनडे सामने झाले आहेत. त्यातील 53 सामन्यात भारताने तर 39 सामन्यात इंग्लंडने बाजी मारली आहे. तसेच भारताने इंग्लंडमध्ये 39 वनडे सामने खेळले असुन त्यातील 16 सामन्यात विजय मिळवण्यात भारताला यश आले आहे. तर 19 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

त्यामुळे आता दुसऱ्या वनडे सामन्यातून भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी तर इंग्लंडचा संघ मालिकेत पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असेल.

इंग्लंड विरुद्ध भारत कधी होणार आहे दुसरा वनडे सामना?

इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा वनडे सामना 14 जुलै 2018 ला होणार आहे.

कोठे होईल इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा वनडे सामना?

इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा वनडे सामना लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.

किती वाजता सुरु होईल इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा वनडे सामना?

भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील  दुसऱ्या वनडे सामन्याला सुरुवात होईल.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा वनडे सामना पाहता येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत  दुसरा वनडे सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?

sonyliv.com या वेबसाईटवर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना ऑनलाइन पाहता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ:

भारत: विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, हर्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, सिद्धार्थ कौल, अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार.

इंग्लंड: इयान मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, मोईन अली, जो रूट, जेक बॉल, टॉम करन, लिआम प्लंकेट, बेन स्टोक्स, आदिल रशिद, डेव्हिड विली, मार्क वुड.

महत्त्वाच्या बातम्या:

चहलला पाहताच मॅक्सवेलला झाली नाटकी नेमारची आठवण!

भारताच्या या फिरकीपटूंना मिळू शकते कसोटीमध्ये संधी, कर्णधार कोहलीने दिले संकेत