पहिल्या दिवशी काय होता टीम इंडियाचा लंचचा मेनू?

लंडन | लॉर्ड्वर गुरुवारपासून (९ ऑगस्ट) भारत-इंग्लंड यांच्यात सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा  पहिला दिवस पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेला.

मात्र पहिल्या दिवसाच्या लंचला टिम इंडियासाठी लॉर्ड्स मैदानावर  चिकन करी, पनीर टिक्का असे अनेक भारतीय खाद्यपदार्थांची सोय करण्यात आली होती.

याची माहिती बीसीसीआयने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली.

अनेक भारतीय खेळाडूंना भारताबाहेर क्रिकेट खेळायला गेल्यावर आपल्या अाहाराची समस्या भेडसावत असते. कारण भारतीय आहार आणि विदेशातील अाहार यात अंतर असल्याने त्यांना याच्याशी जुळवून घेणे कायमच अवघड जात असते.

मात्र यावेळी बीसीसीआयच्या विनंतीवरुन इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने टीम इंडियासाठी खास भारतीय पद्धतीचा आहार देण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-इंग्लंड विरुद्ध भारत: दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर पावसाचे पाणी!

-भारताच्या या माजी खेळाडूंनी केला महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज