विजयपेक्षा चांगलं खेळूनही शिखर धवनला कायमच ‘बळीचा बकरा’ केलं जात

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात शिखर धवन आणि उमेश यादव यांना संघातून वगळ्यात आले. त्यांच्या जागी अनुक्रमे चेतेश्वर पुजारा आणि कुलदीप यादव या खेळाडूंना संधी देण्यात आली.

यामुळे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी मात्र संघ व्यवस्थापनावर चांगलाच निशाना साधला आहेत.

“मला शिखरला वगळणे अजिबात मान्य नाही. त्याला कायमच बळीचा बकरा बनवलं जातं. गेल्याच कसोटी सामन्यात त्याने विजयपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्याला प्रत्येक सामन्यानंतर वगळणे योग्य नाही. जर त्याला तुम्ही प्रत्येक सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यात वगळणार असाल तर संघातच का घेता.” असे त्यांनी सोनी टीव्हीशी बोलताना म्हटले.

असाच काहीसा सुर व्हीव्हीएस लक्ष्मणचा होता. 

“शिखरला वगळणे आश्चर्यकारक होते. आकडेवारी स्पष्ट सांगते की परदेशात फक्त शिखर एकटाच फ्लाॅप नाही. बाकी फलंदाजही परदेशात विशेष कामगिरी करु शकले नाहीत. माझ्याकडे आता आकडेवारी नक्कीच नाही परंतु बाकी तीन खेळाडूंनीही विशेष कामगिरी केली नाही. ” असे शिखर धवनची पाठराखन करताना लक्ष्मण म्हणाला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अर्जून तेंडुलकर करतोय लॉर्ड्सच्या ग्राउंडस्टाफला मदत, चाहत्यांनी केले जोरदार कौतूक

जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी

लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते