Video: टीम इंडियाच्या मदतीला अर्जून धावला, देतोय भारतीय फलंदाजांना वेगवान गोलंदाजीचा सराव

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून नुकतेच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. तो श्रीलंका दौऱ्यात दोन चारदिवसीय सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळला.

परंतू त्याची या दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी संघात निवड झालेली नसल्याने सध्या तो इंग्लंडमध्ये आहे.

यामुळे तो इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला नेटमध्ये गोलंदाजी सराव देत आहे, असे एका व्हिडिओमध्ये दिसून आले आहे.

या व्हिडिओमध्ये अर्जुन भारताचा कर्णधार विराट कोहलीला नेटमध्ये गोलंदाजी करत आहे. त्यावेळी तिथे भारताचे अन्य गोलंदाज आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीही उपस्थित आहेत. या दरम्यान अर्जुन भारताचे फिसीओथेरपीस्ट पॅट्रिक फरहर्ट यांच्याशीही संवाद साधताना दिसला आहे.

याआधीही अर्जुनने अनेकदा भारतीय संघाला नेटमध्ये गोलंदाजी केली आहे. तसेच 2017मध्ये त्याने लॉर्डसच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्याआधी नेटमध्ये गोलंदाजी होती.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन पहिल्या कसोटीत भारताची डोकेदुखी ठरला होता. त्याचबरोबर भारतीय संघात डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज नसल्याने अर्जुनच्या गोलंदाजीची मदत घेतली गेली असण्याची शक्यता आहे.

भारताचा इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर गुरुवार 9 आॅगस्टपासून होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

पहिल्यांदा विश्वचषक जिंकल्यावर करुणानिधींनी चेस सेट भेट दिला होता- विश्वनाथन आनंद

धोनीने विराट कोहलीचे असे कौतुक यापुर्वी कधीही केले नव्हते!

टाॅप ३- या भारतीय खेळाडूंचा २०१९चा विश्वचषक ठरणार शेवटचा!