अर्जुन तेंडुलकरची लॉर्ड्सच्या मैदानावर क्षणभर विश्रांती

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताला एक डाव आणि 159 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

या सामन्यादरम्यान भारताचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने घेतलेल्या पॉवरनॅपमुळे(काही क्षणांची विश्रांती) सध्या तो सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे.

लॉर्ड्स कसोटीच्या सामन्यादरम्यान अर्जुन बाउंड्री लाइनच्या येथे असणाऱ्या जाहिरात बोर्डमागे झोपलेला फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

तसेच काही चाहत्यांना अर्जुनला असे मैदानात झोपलेले पाहुन एम एस धोनीची आठवण आली आहे.

धोनीने मागीलवर्षी पल्लेकेले येथे झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात मैदानात विश्रांती केली होती. या सामन्यात प्रेक्षकांच्या गैरवर्तवणुकीमुळे आलेल्या व्यत्यया दरम्यान त्याने ही विश्रांती घेतली होती.

अर्जुनने लॉर्ड्सवरील सामन्यादरम्यान शनिवारी(11 आॅगस्ट) स्टेडियमबाहेर डिजीटल रेडिओही विकले आहेत. तसेच त्याने या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सतत पावसाचा व्यत्यय येत असल्याने ग्राउंड्सस्टाफलाही मदत केली होती.

तर त्याने इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटीआधी भारतीय फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी सरावही दिला होता.

यामुळे मागील काही दिवसांपासून अर्जुन सतत चाहत्यांमध्ये चर्चेत राहिला आहे.

अर्जुनने नुकतेच 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. तो श्रीलंका दौऱ्यात दोन चारदिवसीय सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळला.

परंतू त्याची या दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी संघात निवड झालेली नसल्याने सध्या तो इंग्लंडमध्ये आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

तिसऱ्या कसोटीत आर अश्विन टीम इंडियाचा कर्णधार?

लॉर्ड्स कसोटी: पावसाचा व्यत्यय कायम, टीम इंडिया संकटात

पाकिस्तानी कर्णधार म्हणतो, टीम इंडियाला आशिया चषकात आम्हीच वरचढ