हे दोन भाऊ खेळू शकतात कसोटी मालिकेत एकाच संघाकडून

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात २० वर्षीय अष्टपैलू सॅम करन इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

सॅम करनने या सामन्यात पहिल्या डावात २४ धावा आणि ४ विकेट तर दुसऱ्या डावात बहुमुल्य ६३ धावा आणि १ विकेट घेत भारतीय संघाला जेरीस आणले होते.

आता याच सॅम करनचा थोरला बंधू टॉम करनलाही इंग्लंड संघात पुनरागमन करुन आपल्या धाकट्या भावासोबत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करण्याचे वेध लागले आहे.

“आमच्या कुटुंबाला क्रिकेटची मोठी परंपरा आहे. माझे वडील केव्हीन करन झिम्बाब्वेकडून दोन विश्वचषक खेळले आहेत.  मी या आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आता सॅमही इंग्लंड संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहूण मला आनंद होत आहे.” असे टॉम करन म्हणाला.

टॉम करनने यापूर्वीच इंग्लंडकडून टी-२, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. मात्र दुखापतीमुळे त्याला इंग्लंड संघातून आपले स्थान गमवावे लागले आहे.

“मी आता पूर्णपणे फिट आहे आणि इंग्लंड संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. मला सॅमच्या खांद्याला खांदा लावून इंग्लंड संघासाठी चांगली कामगिरी करायची आहे.” असे टॉम करन एका मुलाखत कार्यक्रमात म्हणाला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-विराटला रोखण्यासाठी इंग्लंडच्या प्रशिक्षकाची नवी शक्कल

-इंग्लंडच्या दिग्गज महिला क्रिकेटपटूबरोबर अर्जुन तेंडुलकरचे खास डीनर