या कारणामुळे रहाणे तिसऱ्या कसोटीत चमकला

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात अपयशी ठरल्यानंतर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने त्याच्या फलंदाजीचे विश्लेषण केले असल्याचे सांगितले आहे.

ट्रेंटब्रिज येथे होत तिसऱ्या कसोटी सामन्यात मात्र रहाणेची चांगली फलंदाजी पहायला मिळाली. या सामन्यात रहाणेने पहिल्या डावात 81 धावांची खेळी करताना कर्णधार विराट कोहलीबरोबर 159 धावांची भागिदारीही रचली.

त्याच्या या कामगिरीनंतर bcci.tv शी बोलताना रहाणे म्हणाला, “लॉर्ड्स सामन्यानंतर मी ड्रेसिंग रुममध्ये बसून माझ्या चांगल्या खेळींचे विश्लेषण केले. मी त्या कशा खेळल्या होत्या. त्यावेळी माझी मनस्थिती कशी होती. माझा दृष्टीकोन कसा होता याचा विचार केला.”

तसेच तो पुढे म्हणाला, “यश आणि अपयश हे व्यावसायिक क्रिकटपटूला येत असते पण त्याचा काहीतरी हेतू असतो. जर तूमची मनस्थिती आणि दृष्टीकोन बरोबर असेल तर निकाल ही तूमच्या बाजूने लागतो.”

“नक्कीच मी पहिल्या दोन सामन्यांनतर निराश झालो होतो. पण विश्वास होता की जर चेंडू खेळण्यासारखा आला तर तो मी खेळणार. निकाला विषयी खूप विचार केला तर दबाव येतो. त्यामुळे एकावेळी एक चेंडू खेळण्यावर लक्ष असते.

याबरोबरच तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात विराटबरोबर केलेल्या भागिदारीविषयी रहाणे म्हणाला, “जेव्हा मी आणि विराट फलंदाजी करत होतो तेव्हा आमचे लक्ष भागिदारी रचण्याकडे होते.”

“ज्यावेळी आम्ही स्थिर झालो तेव्हा आम्ही धावा करण्यावर आमचे लक्ष केंद्रीत केले. ती भागिदारी आमच्यासाठी महत्त्वाची होती. सुरुवातीपासूनच स्ट्राइक बदलती ठेवण्याचा आमचा हेतू होता.”

याबरोबरच रहाणेने त्याच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

मुंबईकडून ९९ प्रथम श्रेणी सामने खेळणारा नायर आता पाँडिचेरीकडून खेळणार रणजी सामने

विराट कोहलीचा आजच्या दिवसातील ७वा मोठा पराक्रम

पुजारा बाद तर झाला परंतु इंग्लंडला टेन्शन देऊन गेला