हजाराव्या कसोटी सामन्यासाठी सर्वकालीन इंग्लंड संघाची निवड, केविन पीटरसनसह हे खेळाडू आहेत संघात

१ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे.

या मालिकेतील बर्मिंघहम येथील एजबेस्टन मैदानावर होणारा पहिला सामना इंग्लंड क्रिकेट संघाचा १००० वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असणार आहे.

या पार्श्वभूमीवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने 1000 व्या कसोटी सामन्यानिमित्त ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे इंग्लंडचा 11 खेळडूंचा सर्वकालिन कसोटी संघ निवडला आहे.

या सर्वकालीन 11 खेळाडूंच्या कसोटी संघात इंग्लंडकडून सध्या खेळत असलेल्या अॅलिस्टर कुक, जेम्स अॅंडरसन आणि कर्णधार जो रुटचा समावेश आहे.

तर इंग्लंडकडून 2000 च्या दशकात दमदार कामगिरी करणाऱ्या केव्हीन पिटरसनला देखील या संघात निवडण्यात आले आहे.

जुलै महिन्यात दहा दिवसांच्या काळात चाहत्यांनी या सर्वकालीन कसोटी संघासाठी  इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने निवडलेल्या 100 खेळाडूंमधून 11 खेळाडूंची निवड केली.

या निवड झालेल्या सर्व खेळाडूंना १ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी परेडसाठी निमंत्रीत करण्यात आले आहे.

यावेळी इंग्लंडच्या सर्वकालीन कसोटी संघात निवड झाल्यानंतर सध्याच्या इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रुटने आनंद व्यक्त केला आहे.

“मला गर्व आहे की इंग्लिश क्रिकेट चाहत्यांकडून मला सर्वकालीन कसोटी संघात निवडण्यात आले आहे. पण मला या संघात क्रिकेटचे दिग्गज डेनिस कॉम्प्टन आणि वॅली हॅमोंड यांचा नसल्याचे दुख: वाटते. मला या संघात निवडल्याबद्दल सर्व चाहत्यांचे मी आभार मानतो.” असे जो रुट सर्वकालीन संघात निवड झाल्यानंतर म्हणाला.

असा आहे इंग्लंडचा सर्वकालीन कसोटी संघ-

अॅलिस्टर कुक, लेन ह्युटन, डेव्हिड गोव्हर, केव्हिन पिटरसन, जो रुट, इयान बॉथम, अॅलन नॉट (यष्टीरक्षक), ग्रॅमी स्वान, फ्रेड ट्रुमन, जेम्स अॅंडरसन, बॉब विल्स.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

-मिसेस गायतोंडे आहे सेक्रेड गेम्समधील धोनीचं आवडत पात्र

-क्रिकेटमधील आरक्षणावरुन मोहम्मद कैफ संतापला

-टीम इंडियातील ‘तिल्ली’ हे प्रकरण तुम्हाला माहीत आहे का?