या ट्विटमुळे संजय मांजरेकर चाहत्यांकडून ट्रोल

एजबस्टन मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात पहिला कसोटी सामना 1 ते 4 आॅगस्ट दरम्यान पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 31 धावांनी विजय मिळवला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताच्या या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी ट्विट करताना म्हटले आहे की “जेव्हा संघ आणि एखाद्या खेळाडूमध्ये सामना होतो तेव्हा साधारत: संघ विजयी होतोे.”

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली व्यतिरिक्त भारतीय फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. कोहलीने दोन्ही डावात अनुक्रमे 149 आणि 51 धावा अशा मिळून 200 धावा केल्या.

मात्र अन्य फलंदाजांना दोन्ही डावात मिळून प्रत्येकी 60 धावाही करता आल्या नाही. यामुळेच मांजरेकारांनी असे ट्विट केले होते. पण त्यांना चाहत्यांकडून या ट्विटवरुन ट्रोल करण्यात आले आहे.

क्रिकेट चाहत्यांचे म्हणणे आहे की भारताचे हे अपयश फक्त फलंदाजांचे होते. कारण भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करताना दोन्ही डावात इंग्लंडला कमी धावसंख्येवर सर्वबाद केले.

भारताचा इंग्लंड विरुद्ध दुसरा कसोटी सामना गुरुवार 9 आॅगस्टपासून लॉर्ड्स मैदानावर सुरु होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

फलंदाजाचे शतक होऊ नये म्हणुन क्रिकेटमध्ये घडला हा घाणेरडा प्रकार

इंग्लंडच्या दिग्गज महिला क्रिकेटपटूबरोबर अर्जुन तेंडुलकरचे खास डीनर

हे दोन भाऊ खेळू शकतात कसोटी मालिकेत एकाच संघाकडून