क्रिकेट खेळायला गेला आहात, युरोप फिरायला नाही; सुनिल गावसरांनी साधला टीम इंडियावर निशाना

इंग्लंड विरुद्ध बर्मिंगहॅम येथील पहिल्या कसोटी सामन्यातील भारताचा पराभव माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनिल गावसकर यांच्या जिव्हारी लागला आहे.

या पराभवानंतर सुनिल गावसकरांनी भारताच्या पराभावाचे खापर फलंदाजांवर फोडत भारतीय संघाने या कसोटी मालिकेपूर्वी गांभीर्याने सराव आणि तयारी केली नसल्याचे म्हटले आहे.

“भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी पाच दिवसांची सुट्टी घेउन सराव करण्याच्या जागी युरोप भ्रमंती केली. तसेच एक सराव सामना रद्द केला. हे मला आजिबात पटले नाही.”

“मला मान्य आहे की एका मालिकेनंतर खेळाडूंना आरामाची गरज असते. मात्र पाच दिवस आरामासाठी देणे अयोग्य आहे.” असे सुनिल गावसकर म्हणाले.

त्याचबरोबर गावसकरांनी भारतीय फलंदाजांच्या स्विंग गोलंदाजी विरुद्ध खेळण्याच्या तंत्रावरही जोरदार तोफ डागली.

“जेव्हा तुम्ही भारताबाहेर खेळता तेव्हा तुम्ही तेथील परिस्थितींशी जुळवून घेणे महत्वाचे असते. त्यासाठी तुम्हाला सराव करणे गरजेचे असते. जर भारताने पहिल्या कसोटीपूर्वी सराव केला असता तर फलंदाजांना इंग्लंडच्या स्विंग गोलंदाजांसमोर अपयश आले नसते.” असे सुनिल गावसकर पुढे म्हणाले.

भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (4 आॅगस्ट) 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-मयांक अगरवाल, पृथ्वी शाॅच्या फटाकेबाजी समोर दक्षिण आफ्रिका अ उध्वस्त

-सौरव गांगुली म्हणतो, इंग्लंड जिंकायचे असेल तर हे करु नका