विराट क्रिकेटचा हा नावडता प्रकार यापुढे कधीही खेळणार नाही

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नव्याने सुरु होत असलेल्या १०० चेंडूच्या क्रिकेटमध्ये भाग घेण्यास नापसंती दर्शवली आहे.

“मला जास्त क्रिकेट खेळण्यामुळे बऱ्याच वेळा त्रास होतो. क्रिकेटमधील व्यायसायितेचा क्रिकेटवर परीणाम होत आहे याचे मला दु:ख आहे. ” असे विराट यावेळी म्हणाला.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड १०० चेंडूंचा सामना असलेला क्रिकेटचा नवा प्रकार सुरु करणार आहे. विराटने या प्रकारच्या क्रिकेटचा भाग न बनण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

“या खेळाबरोबर जे लोक जोडले आहेत त्यांना यात एक थरार वाटतो. एक मनोरंजन वाटते परंतु मला हा प्रकार खेळायला नाही आवडणार. ” असे बोलत विराटने याबद्दल नापसंती दर्शविली.

विराटने यावेळा क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटला महत्त्व देण्याचे आणि तो प्रकार वाढविण्याचे सुचविले आहे.

“जर तुम्ही प्रथम श्रेणी क्रिकेटला प्राधान्य दिले नाही तर एकदिवस तुम्ही खेळाडूंना या प्रकारच्या खेळापासून दुर न्याल. टी२० क्रिकेट आल्यामुळे वेगवेगळ्या क्रिकेट बोर्डांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी आता प्रथम श्रेणी क्रिकेटकडे लक्ष दिले पाहिजे. खेळाडूंच्या मनात अशी कधीही भावना व्हायला नको की ज्यामुळे ते सोप्या मार्गाचा अवलंब करतील. “असे विराटचे कसोटी तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटचे महत्त्व सांगताना अधोरेखीत केले.

महत्त्वाच्या बातम्या-

 एशियन गेम्स: भारताला मिश्र रिलेत ऐतिहासिक रौप्यपदक

 …तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!

भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीत या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष…

 आफ्रिदीला ‘बूम-बूम’ हे फेमस टोपण नाव देणारा कोण होता तो भारतीय खेळाडू

लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे

-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?

-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड

-एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक

-भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी