विराटला कसे रोखायचे हे आम्हाला चांगलेच ठाउक आहे

बर्मिंघहम | मंगळवारी (३१ जुलै) भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रुटची पत्रकार परिषद झाली.

या पत्रकार परिषदेत जो रुटने भारतीय कर्णधार विराट कोहली, आदिल रशिद आणि एजबेस्टन मैदानावर होणाऱ्या पहिल्या सामन्याविषयी चर्चा केली.

गेल्या काही वर्षात विराट कोहलीने जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याने इंग्लंड वगळता इतर सर्वत्र दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे या इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यासाठी विराट सर्वस्व पणाला लावणार आहे.

“विराटने गेल्या चार वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. मात्र तरीही आमच्याकडे विराटला रोखण्यासाठी खास योजना आहेत. विराट जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे त्यामुळे त्याच्याकडेही आमच्या योजनांसाठी नक्की उत्तर असेल.” असे रुट म्हणाला.

भारता विरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या आदिल रशिदला पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघात स्थान देण्यात आले आहे. पुढे रुटने आदिल रशिदच्या वादग्रस्त निवडीवरही भाष्य केले.

“रशिदवर होणाऱ्या टीकेमुळे इंग्लंड संघाला काहीही फरक पडत नाही. त्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे. मला विश्वास आहे की तो कसोटी मालिकेतही चांगली कामगिरी करेल.” असे इंग्लिश कर्णधार जो रुट म्हणाला.

तसेच बर्मिंघहम येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ सर्वोत्तम कामगिरी करत भारताला रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. असे जो रुटने सांगितले.

भारतीय प्रमाण वेळेनुसार आज दुपारी 3.30 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-तरच भारतीय गोलंदाज इंग्लंडमध्ये यशस्वी होतील

-‘हे’ केल्यास विराट कोहलीला मोठी खेळी करण्यापासून कोणी रोखू शकणार नााही