video: पंड्याच्या अफलातून झेलवर धोनीची बहुमूल्य प्रतिक्रिया !

दिल्ली । काल भारत विरुद्द न्यूजीलँड सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

यावेळी हार्दिक पंड्याने जेव्हा मार्टिन गप्टिलचा अफलातून झेल घेतला तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. परंतु सर्वात बहुमूल्य प्रतिक्रिया आली ती भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनीची.

अगदी कॅमेरामॅनही ही प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद करण्यात चुकला नाही. झेल झाल्यानंतर स्लो मोशनमध्ये ही प्रतिक्रिया दाखवण्यात आली.

पंड्याने अगदी शेवटच्या क्षणी उडी मारत हा खास सिझेल घेतला होता. यावेळी गोलंदाजी करत असलेल्या युझवेन्द्र चहललाही आपला आनंद लपवता आला नाही.