असे आहेत पुण्यात होणाऱ्या वनडे सामन्याच्या तिकिटाचे दर

पुणे । भारत विरुद्ध न्यूजीलँड वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या, गहुंजे येथील स्टेडियमवर होणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सामन्याच्या तिकीट विक्रीला उद्या अर्थात २९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.

या मैदानावर होणारा हा तिसरा वनडे सामना असून याचे तिकिटाचे दर आज महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनकडून घोषित करण्यात आले. यात ८०० रुपयांपासून ते ३५०० रुपयांपर्यंत तिकिटांचे दर असणार आहेत. यात ८०० रुपये, ११०० रुपये, २००० रुपये, १७५० रुपये आणि ३५०० रुपये असे दर असणार आहेत.

ही तिकिटे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही प्रकारे विकली जाणार आहेत. ऑनलाईन तिकिटे ही www.bookmyshow.com या वेबसाईटवर तर ऑफलाईन तिकिटे ही पीवायसी हिंदू जिमखाना तसेच गहुंजे स्टेडियम येथे मिळणार आहेत.

भारत विरुद्ध न्यूजीलँड यांच्यात पुण्यात होणार हा तिसरा वनडे सामना असून यापूर्वी १९९५-९६ आणि त्यांनतर ८ वर्षांनी असे दोन वनडे सामने पुण्यातील नेहरू स्टेडियम येथे झाले होते. हा सामना डे-नाइट वनडे सामना आहे.

भारत-न्यूजीलँड वनडे सामन्याचे तिकीटविक्रीचे दर असे-
वेस्ट स्टॅन्ड आणि ईस्ट स्टॅन्ड- ८०० रुपये
साऊथ अप्पर- ११०० रुपये
साऊथ लोवर- २००० रुपये
साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट स्टॅन्ड- १७५० रुपये
नॉर्थ स्टॅन्ड आणि नॉर्थ ईस्ट- १७५० रुपये
नॉर्थ स्टॅन्ड- २००० रुपये
साऊथ पॅव्हिलिअन आणि बी- ३५०० रुपये