भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी घोषणा, या दोन युवा खेळाडूंना संधी

0 284

आज बीसीसीआय निवड समितीने न्यूजीलँड विरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. या संघात श्रेयश अय्यर आणि मोहम्मद सिरज या दोन युवा खेळाडूंना संधी देण्यात अली आहे.

निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद अय्यरच्या निवडीबद्दल म्हणाले “अय्यरने जवळ जवळ सगळ्या प्रकारात चांगली कामगिरी केली आहे. ज्यात प्रथम श्रेणी, वनडे आणि टी २० चा समावेश होतो. तो सातत्याने अशी कामगिरी करत आहे. जर आम्हाला एखाद्या खेळाडूची निवड करायची असेल तर आणि त्याला जास्त संधी देऊ. सिरजच्या बाबतीतही हे लागू होते.”

श्रेयश अय्यरने न्यूजीलँड विरुद्ध सराव सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर तो भारतीय अ संघातूनही उत्तम कामगिरी करत आहे. तसेच सिरजनेही भारतीय अ संघातून आणि यावर्षीच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून खेळताना चांगला खेळ केला होता.

त्याचबरोबर निवड समितीने कामगिरीत सातत्य राखता न आल्याने केदार जाधवला संघातून वगळलं आहे. त्याचबरोबर विकेटकिपर दिनेश कार्तिकला संधी देण्यात आले आहे.

१ नोव्हेंबर पासून भारत विरुद्ध न्यूजीलँड अशी टी २० मालिका होणार आहे. यातील पहिला सामना हा भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना असणार आहे. हा सामना दिल्लीला त्याच्या घरच्या मैदानावर होणार आहे. त्याने काही दिवसांपूर्वी आपण निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले आहे.

नेहरा बाबतीत वक्तव्य करताना एमएसके प्रसाद म्हणाले “आम्ही आत्ताच सांगू शकत नाही की ११ जणांच्या संघात नेहराला स्थान मिळेल की नाही. हे पूर्णपणे संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांच्या हातात आहे. त्यामुळे आम्ही कोणतीही खात्री देऊ शकत नाही की तो संघात असेल की नाही. या गोष्टीचा त्यादिवशी निर्णय घेतला जाईल”

असा आहे भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), भुवनेश्वर कुमार,हार्दिक पंड्या,शिखर धवन,मोहम्मद सिरज,श्रेयश अय्यर, अक्षर पटेल, कुलदीप यादव,मनीष पांडे, केएल राहुल, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, एमएस धोनी,युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा.

 

Comments
Loading...
%d bloggers like this: