काय आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सामन्यांचा इतिहास?

मुंबई | भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये विश्वचषक २०१९चा सेमीफायनलचा अतिशय महत्त्वाचा सामना होणार आहे. विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे.

या विश्वचषकात भारतीय संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार समजले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेले ऑस्ट्रेलिया, इंग्लंड तसेच न्यूझीलंड हेही तगडे संघ आहे.

भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली सेमीफायनलमध्ये खेळले तर न्यूझीलंडचा संघ फॅब ४मधील केन विलीयम्सच्या नेतृत्त्वाखाली खेळेल.

वनडे क्रिकेटच्या इतिहासात जरी भारतीय संघाने बाजी मारली असली तरी विश्वचषक आणि इंग्लंडमध्ये झालेल्या वनडेत न्यूझीलंडच किंग राहिलेला आहे. परंतु भारतीय संघ आता जुना भारतीय संघ नाही. यावेळी न्यूझीलंड भारताला कमी समजण्याची चुक नक्कीच करणार नाही.

अशा या दोन संघातील वनडेची आकडेवारी थोडक्यात- 

भारत विरुद्ध न्यूझीलंड
एकूण वनडे- १०६
भारत विजयी- ५५
न्यूझीलंड विजयी- ४५
टाय- १
अनिर्णित- ५

भारत विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषकात
एकूण वनडे- ७
भारत विजयी- ३
न्यूझीलंड विजयी- ४

१ जानेवारी २०१५ पासून विश्वचषकात
एकूण वनडे- १३
भारत विजयी- ९
न्यूझीलंड विजयी- ४

भारत विरुद्ध न्यूझीलंड इंग्लंड देशात
एकूण वनडे- ३
भारत विजयी- ०
न्यूझीलंड विजयी- ३

भारत विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषकातील कामगिरी
सर्वाधिक धावा
१७२- सुनिल गावसकर, सामने- ४
१५७- ग्लेन टर्नर, सामने- २
१४७- मोहम्मद अझरुद्दीन, सामने- ४
१३१- अॅंड्रू जोन्स, सामने- २

भारत विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषकातील कामगिरी
सर्वाधिक विकेट्स
६- ब्रायन मेकंझी, सामने- २
५- दिपक पटेल, सामने- ३
५- मनोज प्रभाकर, सामने- ३
४- सर रिचर्ड हेडली, सामनेे- २

भारत विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषकातील कामगिरी
सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
११४- ग्लेन टर्नर
१०३- सुनिल गावसकर
८४- ब्रुस एजर
८४- सचिन तेंडूलकर

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१७५०- सचिन तेंडूलकर, सामने- ४२
१३०२- विराट कोहली, सामने- २२
१२०७- नेथन अॅस्टल, सामने- २९
११५७- विरेंद्र सेहवाग, सामने- २३
१११८- मोहम्मद अझरुद्दीन, सामने- ४०

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडेत सर्वाधिक विकेट घेणारे फलंदाज
५१- जवागल श्रीनाथ, सामने- ३०
३९- अनिल कुंबळे, सामने- ३१
३३- कपिल देव, सामने- २९
३२- काईल मिल्स, सामने- २९

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडेत सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक
१८- स्टिफन फ्लेमिंग
१८- राॅस टेलर
१५- मोहम्मद अझरुद्दीन
१४- कपिल देव
१३- ख्रीस हॅरिस

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाने असा साजरा केला एमएस धोनीचा वाढदिवस, पहा व्हि़डिओ

गांगुली, सचिन नंतर किंग कोहली असा विक्रम करणारा केवळ तिसरा भारतीय

विश्वचषकात ११ वर्षांनंतर कोहली समोर पुन्हा विलियम्सनच्या न्यूझीलंडचे आव्हान; होणार खास योगायोग

…आणि अखेर धोनीचे गेल्या वाढदिवसाला अपुर्ण असलेले स्वप्न पुर्ण झाले