भारत पाकिस्तान सामन्यासाठी असे आहेत तिकीटांचे दर

विश्वचषक 2019 साठी अाता जवळ जवळ एकच वर्षच बाकी असताना आयसीसीने काल या स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर केले आहे. त्याचबरोबर आयसीसीने विश्वचषक 2019 मध्ये होणाऱ्या सामन्यांच्या तिकीटांचे दरही घोषित केले आहेत.

यामध्ये प्रत्येक संघाच्या सामन्यांच्या तिकीटांचे दर वेगवेगळे आहेत. तसेच हे  तिकीटांचे दर प्लॅटिनम, गोल्ड, सिल्व्हर ओणि ब्राँझ अशा वेगवेगळ्या विभागात विभागले आहेत.

त्याचबरोबर लहान मुलांसाठीही गोल्ड, सिल्व्हर ओणि ब्राँझ या विभागात वेगळे तिकीटांचे दर असणार आहेत.

तसेच 4 जणांच्या कुटुंबासाठी 52 युरो एवढे तिकीटांचे दर असतील. तर 2 लाखांपेक्षा जास्त तिकीटे ही 50  युरोपेक्षा कमी रकमेची आहेत. लहान मुलांसाठीची तिकीटे 6 युरोपासुन सुरू आहेत.

शिवाय 2019 च्या विश्वचषकाचे स्वरूप 1992 च्या विश्वचषकाप्रमाणे असणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ साखळी फेरीत एकमेकांविरूद्ध लढतील आणि यामुळेच सर्वांनाच उत्सुकता असलेला भारत विरूद्ध पाकिस्तान सामनाही प्रेक्षकांना साखळी फेरीतच पहाता येणार आहे.

हा सामना 16 जून 2019 ला होणार आहे. या सामन्यासाठी तिकीटांचे दर प्लॅटिनममध्ये 235 युरो म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळ जवळ 21, 833 रूपये आहेत.

याबरोबरच गोल्डचे 150 युरो, सिल्व्हरचे 115 युरो आणि ब्राँझचे 70 युरो, तर लहान मुलांसाठी गोल्डचे 30 युरो, सिल्व्हरचे 25 युरो आणि ब्राँझचे 6 युरो असे तिकीटांचे दर असतील.

तसेच भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याप्रमाणे भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लड आणि बांग्लादेश या सामन्यांचे दर सारखे असणार आहेत.

विश्वचषक 2019 तील भारताच्या सामन्यांसाठी असे असतील तिकीटांचे दर:

5 जून- भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका:

प्लॅटिनम-235 युरो, गोल्ड -150 युरो, सिल्व्हर- 115 युरो, ब्राँझ- 70 युरो ;

लहान मुलांसाठी:  गोल्ड- 30 युरो, सिल्व्हर- 25 युरो, ब्राँझ- 6 युरो

9जून- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया: 

प्लॅटिनम-235 युरो, गोल्ड -150 युरो, सिल्व्हर- 115 युरो, ब्राँझ- 70 युरो ;

लहान मुलांसाठी:  गोल्ड- 30 युरो, सिल्व्हर- 25 युरो, ब्राँझ- 6 युरो

13जून- भारत विरूद्ध न्यूझिलंड:

प्लॅटिनम-195 युरो, गोल्ड -125 युरो, सिल्व्हर- 95 युरो, ब्राँझ- 55 युरो ;

लहान मुलांसाठी:  गोल्ड- 20 युरो, सिल्व्हर- 15 युरो, ब्राँझ- 6 युरो

16जून- भारत विरूद्ध पाकिस्तान:

प्लॅटिनम-235 युरो, गोल्ड -150 युरो, सिल्व्हर- 115 युरो, ब्राँझ- 70 युरो ;

लहान मुलांसाठी:  गोल्ड- 30 युरो, सिल्व्हर- 25 युरो, ब्राँझ- 6 युरो

22जून- भारत विरूद्ध अफगाणिस्तान:

प्लॅटिनम-125 युरो, गोल्ड -95 युरो, सिल्व्हर- 60 युरो, ब्राँझ- 40 युरो ;

लहान मुलांसाठी:  गोल्ड- 20 युरो, सिल्व्हर- 15 युरो, ब्राँझ- 6 युरो

27जून- भारत विरूद्ध विंडिज:

प्लॅटिनम-195 युरो, गोल्ड -125 युरो, सिल्व्हर- 95 युरो, ब्राँझ- 55 युरो ;

लहान मुलांसाठी:  गोल्ड- 20 युरो, सिल्व्हर- 15 युरो, ब्राँझ- 6 युरो

30जून- भारत विरूद्ध इंग्लड:

प्लॅटिनम-235 युरो, गोल्ड -150 युरो, सिल्व्हर- 115 युरो, ब्राँझ- 70 युरो ;

लहान मुलांसाठी:  गोल्ड- 30 युरो, सिल्व्हर- 25 युरो, ब्राँझ- 6 युरो

02 जुलै-  भारत विरूद्ध बांग्लादेश:

प्लॅटिनम-235 युरो, गोल्ड -150 युरो, सिल्व्हर- 115 युरो, ब्राँझ- 70 युरो ;

लहान मुलांसाठी:  गोल्ड- 30 युरो, सिल्व्हर- 25 युरो, ब्राँझ- 6 युरो

06 जुलै-  भारत विरूद्ध श्रीलंका:

प्लॅटिनम-195 युरो, गोल्ड -125 युरो, सिल्व्हर- 95 युरो, ब्राँझ- 55 युरो ;

लहान मुलांसाठी:  गोल्ड- 20 युरो, सिल्व्हर- 15 युरो, ब्राँझ- 6 युरो

09 जुलै- पहिला उपांत्य सामना:

प्लॅटिनम-240 युरो, गोल्ड -155 युरो, सिल्व्हर- 115 युरो, ब्राँझ- 75 युरो ;

लहान मुलांसाठी:  गोल्ड- 30 युरो, सिल्व्हर- 25 युरो, ब्राँझ- 15 युरो

11जुलै-  दुसरा उपांत्य सामना:

प्लॅटिनम-240 युरो, गोल्ड -155 युरो, सिल्व्हर- 115 युरो, ब्राँझ- 75 युरो ;

लहान मुलांसाठी:  गोल्ड- 30 युरो, सिल्व्हर- 25 युरो, ब्राँझ- 15 युरो

14 जुलै –  अंतिम सामना:

प्लॅटिनम-395 युरो, गोल्ड -295 युरो, सिल्व्हर- 195 युरो, ब्राँझ- 95 युरो ;

लहान मुलांसाठी:  गोल्ड- 40 युरो, सिल्व्हर- 30 युरो, ब्राँझ- 20 युरो

महत्त्वाच्या बातम्या –

पहा व्हिडीओ- सिक्सर किंग जेव्हा आजमावतो स्टंपमागे नशीब

आयपीएल होणारच, पण भारतात नाही तर या देशात!

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच जुळून आला असा योगायोग

भारतीय संघातील या दोन मित्रांचं मराठीतील संभाषण नक्की पहा

कसोटी क्रिकेट चाहत्यांसाठी हे आहे नाराज करणारे वृत्त

– सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने

टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच

आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली