भारत विरुद्ध पाकिस्तान: क्रिकेटच महायुद्ध.

– सचिन आमुणेकर 

आजचा दिवस म्हणजे क्रिकेट प्रेमींचा आवडता दिवस कारण आज दुपारी 3 वाजता बिगुल वाजणार आहे रोमांचंक पाकिस्तान विरुद्ध भारत ह्या सामान्याच.हे दोन्ही संघ पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून पुऱ्या जगात ओळखले जातात. एकमेकांना हरवण्यास दोन्ही संघ कधीही तयार असतात.

हा सामना अटीतटीचा होणार हे नक्की. पाकिस्तानकडून भेदक गोलंदाज तर भारताकडून आक्रमक फलंदाज असा सामना पाहायला मिळेल. पाकिस्तान खूप वर्षानंतर आपल्या लाडक्या अष्टपैलू फिरकी गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज अशी दुहेरी ओळख असणाऱ्या शाहिद आफ्रिदी शिवाय मैदानात उतरणार आहे. या अनुभवी खेळाडूची कमतरता पाकिस्तानला नक्की जाणवेल. पाक संघात शोएब मलिक, वहाब रियाझ आणि महंमद हफीजकडे चांगला अनुभव आहे. कर्णधार सर्फराज अहमद याच तीन अनुभवी खेळाडूंना हाताशी धरून तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानी संघाची गोलंदाजीची कमान हि युवा मोहम्मद आमिरवर असणार आहे. अमीरचा अचूक आणि जोरदार मारा हि त्याची ओळख..भारतीय संघाला जर कोणी संकटात आणेल तर तो म्हणजे मोहंमद आमिरच.

भारतीय संघ मात्र पूर्णपणे आत्मविश्वासाने भरलेला असेल. आज आपल्याला भारतीय कर्णधार कोहलीच विराट रूप पाहायला भेटेल हे नक्की. बुमराह, भुवणेश्वर कुमार आणि शामी यांच्या भेदक आणि अचूक माऱ्यासमोर पाकिस्तानी संघ कसा खेळणार यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे.जडेजा आणि अश्विन यांच्या जादुई फिरकीत जर प्रतिस्पधी संघ फसला तर त्याना सामना हरण्यापासून कोणीही वाचवु शकत नाही.रोहित शर्मा नावाचं ब्राह्मास्त्र जर पाकिस्तान संघावर पडल तर मग पाकिस्तान संघाचं मात्र काही खर नाही कारण रोहित शर्मा हा असा खेळाडू आहे की जो एकटाच पुऱ्या पाकिस्तानी संघावर भारी पडू शकतो.

 

संभाव्य संघ

भारत – धवन,रोहित,कोहली,युवराज, धोनी,पांड्य,अश्विन,जडेजा,उमेश,भुवनेश्वर.

पाकिस्तान
अझर अली,अहमद शेहजाद, बाबर आजम,
महंमद हाफीज,शोहेब मलिक,सारफरझ इहमद,इमद वसीम,फहिम्म असर्फ, महंमद अमीर,जुनिद खान .